अर्जेंटिनाच्या चार खेळाडूंना पकडण्यासाठी मैदानात घुसले पोलिस; मेस्सी-नेमारपुढे गोंधळ, सामना रद्द


साओ पावलो : ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक पात्रता सामन्यावेळी नाट्यमय घटना घडल्याने तो पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे चार खेळाडूंनी उल्लंघन केल्याने चालू सामन्यावेळी नाट्यमय घटना घडली. कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना मैदानात धाव घ्यावी लागली. यावेळी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमारही सामन्यात खेळत होते. दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत असताना सामना सातव्या मिनिटाला थांबवावा लागला.

वाचा-टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली; संध्याकाळी होणार घोषणा

खेळाडू, प्रशिक्षक, फुटबॉल अधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्यात यावेळी बरीच चर्चा झाली. ब्राझीलच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, इंग्लंडमधून परतलेले अर्जेंटिनाचे तीन खेळाडू विलगीकरणात असायला हवे होते, पण ते सामना खेळत होते. विश्वचषक पात्रता फेरीसाठी सुरू असलेल्या या सामन्याचे आता पुढे काय करायचे, याचा निर्णय फिफाला घ्यावा लागणार आहे.

वाचा- England vs India 4th Test: आज होणार चौथ्या कसोटीचा फैसला; हा फॅक्टर ठरवणार विजय

ब्राझीलच्या आरोग्य संस्थेचे अध्यक्ष अँटोनियो बॅरा टोरेस यांनी सांगितले की, ब्राझीलचा कोरोना प्रोटोकॉल मोडल्याबद्दल अर्जेंटिनाच्या त्या सर्व खेळाडूंना दंड आकारून परत पाठवले जाईल. चौघांना क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास सांगितले गेले होते, पण त्यापैकी तिघे सामना खेळण्यासाठी मैदानात आले होते.

वाचा- Video: विराट कोहलीला आला राग; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ होतोय व्हायरल

एस्टन व्हिलाचा एमिलियानो मार्टिनेझ आणि एमिलियानो बुएंडिया आणि टोटेनहॅमचा जिओव्हानी लो सेल्सो आणि क्रिस्टियन रोमेरो हे प्रीमियर लीग खेळून इंग्लंडहून ब्राझीलला परतले होते. त्यांना दहा दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले होते, पण ते खेळण्यासाठी थेट मैदानात उतरले. ब्राझीलचे कोरोना प्रोटोकॉल कठोर असल्याने त्या खेळाडूंच्या अडचणीत भर पडली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: