Video: विराट कोहलीला आला राग; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ होतोय व्हायरल


लंडन : हिटमन रोहित शर्माने ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात १२७ धावांची अतुलनीय खेळी करत परदेशात आपल्या पहिल्या शतकाची प्रतीक्षा संपवली, पण दुसरीकडे संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकांचा दुष्काळ अजूनही कायम आहे. विराटने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले आणि दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केल्यानंतर ४४ धावांवर तो बाद झाला. तो पॅव्हेलियनमध्ये परतला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.

एवढंच नाही, जेव्हा कोहली ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, तेव्हा त्याने दरवाजावर जोरदार मुक्का मारताना दिसला. त्याला राग येणं साहजिकच आहे. २०१९ पर्यंत त्याने एकापाठोपाठ एक शतके ठोकून अनेक विक्रम आपल्या नावे केले होते, पण दोन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यावर कोहलीने आपला राग व्यक्त केला, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे.

दुसऱ्या डावात विराटला मोईन अलीने क्रेग ओव्हरटनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने ९६ चेंडूत ७ चौकार मारले. कर्णधार कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटीत शेवटचे शतक केले होते.

महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ एकदिवसीय शतके केली आहेत, तर कसोटीत त्याच्या नावावर २७ शतके आहेत. कोहलीने आपले पहिले एकदिवसीय शतक डिसेंबर २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर केले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: