पंजशीरमध्ये तालिबान-पाकिस्तानची सरशी?; सालेह, अहमद मसूद अज्ञात स्थळी!


काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधकांचा अभेद्य गड समजला जाणाऱ्या पंजशीरच्या बहुतांशी भागावर तालिबानने पाकिस्तानच्या मदतीने नियंत्रण मिळवल्याचे वृत्त आहे. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, मात्र पंजशीर प्रांतावर विजय मिळवता आला नव्हता. तालिबानने पंजशीरचा विजय प्रतिष्ठेचा केला. त्यानंतर १० हजारांची फौज अमेरिकन शस्त्रांसह पाठवली होती. रविवारी रात्री पाकिस्तानी आणि तालिबानी सैन्याने पंजशीर खोऱ्यात जोरदार हल्ला केला. यामध्ये बंडखोरांचे नेते अहमद मसूद यांना धक्का बसला. मसूद यांचे निकटवर्तीय आणि प्रवक्ते फहीम दश्ती आणि कमांडर जनरल साहिब अब्दुल वदूद झोर ठार झाले.

अफगाणिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्वत:ला अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केलेले माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्या घरावरही पाकिस्तानी हवाई दलाने हल्ला केला. तालिबानला पाकिस्तानकडून हवाई मदत मिळत असल्याचे बंडखोरांच्या नॅशनल रेझिस्टन्स फोर्सने म्हटले आहे. तालिबानच्या ताब्यात असलेल्या अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टरमधून बंडखोरांवर गोळीबार करण्यात येत आहे.

पंजशीर: तालिबानच्या मदतीला पाकिस्तान उतरला; हवाई दलाकडून ड्रोन हल्ले!
पाकिस्तानच्या हवाई दलाने ड्रोन हल्ले सुरू केल्यानंतर तालिबानला पंजशीरमध्ये आघाडी मिळाली. तालिबान आणि पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूद हे दोघेही सुरक्षित ठिकाणी रवाना झाल्याचे वृत्त आहे. अहमद मसूद हे ताजिकिस्तानमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. तर, तालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवला असल्याचा दावा केली आहे.

होय, तालिबानला आम्हीच मदत केली; पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली

पंजशीर खोऱ्यात तालिबानचा भीषण हल्ला; रात्रभर रॉकेट हल्ले
दरम्यान, तालिबानने पंजशीर खोऱ्यात जाणाऱ्या सर्व वस्तूंचा पुरवठा रोखला होता. त्यामुळे पंजशीरच्या बंडखोरांना वेळेवर रसद मिळाली नाही. त्याशिवाय, त्यांच्याजवळील दारूगोळा देखील संपू लागला होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: