IND v ENG : पाचव्या दिवशी होणार काँटे की टक्कर, भारत आणि इंग्लंड विजयासाठी झुंजणार


लंडन : ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण चौथ्या दिवसाच्या अखेरीस सामना दोलायमान अवस्थेत आहे. त्यामुळे उद्या कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारताने दुसऱ्या डावात धडाकेबाज फलंदाजी करत ४६६ अशी दमदार धावसंख्या रचली. त्यामुळे भारताला इंग्लंडपुढे विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने चांगली सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी संयत खेळत करत भारताला चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताने यावेळी दोन विकेट्स मिळवल्या असत्या तर त्यांच्या बाजूने हा सामना झुकू शकला असता. पण इंग्लंडला रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी चौथा दिवस खेळून काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ७७ अशी मजल मारली आहे. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २९१ धावांची गरज आहे, त्याचबरोबर भारताला विजय मिळवायचा असेल तर त्यांना १० विकेट्स काढाव्या लागतील. हा सामना अनिर्णीत राहील, असे सध्याच्या घडीला वाटत नाही. या सामन्याचा निकाल लागेल, असेच सध्या दिसत आहे. पण हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, हे सर्वात महत्वाचे असेल. कारण हा सामना जो संघ जिंकेल त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे हा विजय मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे. सध्याच्या घडीला तरी दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. पण या संधाचे सोने कोणता संघ करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांना गंभीर दुखापत…
रोहित शर्माचा गुडघा दुखावला आहे, त्यामुळे तो मैदानात येऊ शकला नाही. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराच्या डाव्या पायाचा घोटा दुखावला आहे, त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्यालाही मैदानात उतरला आले नाही. भारतासाठी हे दोन्ही खेळाडू महत्वाचे आहेत. कारण या दोन्ही खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: