मोठी धावसंख्या उभारल्यावर भारताला मोठे धक्के, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानाबाहेर


लंडन : भारताने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करताना ४६६ धावा केल्या खऱ्या, पण त्यानंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. कारण भारताच्या दोन खेळाडूंना गंभीर दुखापत झाली असून त्यांना मैदानाबाहेर जावे लागले आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
भारतीय संघाने इंग्लंडपुढे मोठे आव्हान ठेवले, पण त्यांना त्यांचे दोन महत्वाचे खेळाडू मैदानात उतरू शकले नाहीत. रोहित शर्माचा गुडघा दुखावला आहे, त्यामुळे तो मैदानात येऊ शकला नाही. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराच्या डाव्या पायाचा घोटा दुखावला आहे, त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्यालाही मैदानात उतरला आलेले नाही.

रोहितने एकाच शतकासह रचले बरेच विक्रम….
धडाकेबाज सलामवीर रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील ८ वे शतक आणि परदेशातील पहिले शतक २०४ चेंडूत पूर्ण केले. या शतकासह त्याने भारताचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडला मागे टाकलं आहे. त्याचबरोबर त्याने विवियन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरीही केली. एवढंच नाही तर रोहित आता डॉन ब्रॅडमनच्या एका खास विक्रमापासून फक्त २ पावलं दूर आहे. इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या तिनही प्रकारांमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला परदेशी क्रिकेटपटू बनला आहे. इंग्लंडच्या भूमीवर कसोटी स्वरूपातील रोहितचे हे पहिले शतक आहे. आतापर्यंत त्याने इंग्लंडच्या भूमीवर ७ शतके केली आहेत. टी-२० मध्येही त्याने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये शतक झळकावलं आहे. २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता कसोटीत पदार्पण केले होते. रोहितने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. तो सामना भारताने एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला होता. त्यानंतर २०१३ मुंबई कसोटीत नाबाद १११ धावा केल्या होत्या. तोदेखील सामना भारताने एक डाव आणि १२६ धावांनी जिंकला होता. तिसरे शतक झळकायला चार वर्षे लागली. २०१७च्या नागपूर कसोटीत त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १०२ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना एक डाव आणि २३९ धावांनी जिंकला होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: