Oval Test : भारतीय संघाला मोठा धक्का, चार प्रशिक्षकांना संघाबाहेर ठेवण्याची आली पाळी…


लंडन : इंग्लंडमधील भारतीय संघाला आता मोठा धक्का बसला आहे. कारण भारताच्या चार प्रशिक्षकांना आता संघाबाहेर ठेवण्याची वेळ आली आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे चौथेही आता भारतीय संघाबरोबर नसतील. या चौघांनाही भारतीय संघाच्याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे, पण या चौघांनाही भारतीय संघाबरोबर प्रवास करता मात्र येणार नाही. या चौघांच्या करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. जर या करोना चाचण्यांमध्ये निगेटीव्ह सापडल्यावरच त्यांना संघाबरोबर राहता येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंचीही आता करोना चाचणी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण या चौघांच्या संपर्कात भारताचे खेळाडू आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातून खेळाडूंना कोणता धोका तर नाही ना, हे तपासून पाहण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघााठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक पत्र लिहिले आहे, यामध्ये ही सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयने ही माहिती अधिकृतपणे सर्वांना कळवली आहे. त्यामुळे आता हे चारही प्रशिक्षक जोपर्यंत भारतीय संघात येत नाहीत, तोपर्यंत बीसीसीआय आणि भारतीय संघात नक्कीच चितेचे वातावरण असेल. आता या चारही प्रशिक्षकांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. काही दिवसांतच त्यांचा आयसोलेशनचा कालावधी संपुष्टात येईल. पण या सर्वांसाठी करोना चाचणीचा अहवाल सर्वात महत्वाचा असेल. कारण हा अहवाल निगेटीव्ह आल्याशिवाय त्यांना संघात प्रवेश करता येणार नाही. त्याचबरोबर खेळाडूंच्याही चाचण्या करण्यात येणार आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीबरोबरच पाचव्या कसोटीवरही या सर्व गोष्टींचे ढग नक्कीच असतील. त्यामुळे भारतीय संघासाठी आगामी काही दिवस फार महत्वाचे असतील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: