ठरलं! चिपी विमानतळासाठी नाव मुहूर्त, ‘या’ दिवशी होणार उद्घाटन


हायलाइट्स:

  • सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची प्रतीक्षा संपली
  • नवरात्रीपर्यंत विमानतळ सुरू होण्याची शक्यता
  • खासदार विनायक राऊत यांनाही विश्वास

सिंधुदुर्गः गेली अनेक वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी नवा मुहूर्त सापडला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. चिपी विमानतळ प्रवासी विमान उड्डाणास सज्ज झाला आहे. अलाएन्स एअर या विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीनेही ७ ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

गणेशोत्सवाच्या आधी चिपी विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याचा दावा आधी करण्यात येत होता. मात्र, आता पुन्हा एकदा विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. नवरात्रोत्सावाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे. विनायक राऊत यांनी तसे संकेत दिले आहेत.

‘जनतेच्या जीवाशी खेळू नका, आंदोलन करायचे तर करोना विरुद्ध करा’

काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो. मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हीकेशन प्राधिकरणाचे सचिव, डीजीसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनी या सर्वांशी मी संपर्क साधला. त्यावेळी येत्या ७ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळ वाहतुकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, चिपी विमातळाचे उद्घाटन ७ ऑक्टोबर रोजी करण्यात यावे व त्यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना दिले आहे. यावेळी मंत्री अनिल परब व खासदार अनिल परब उपस्थित होते.

पैसे कमवा, आपली दुकाने चालवा; सरकारचं हे बरं चाललंय: राज ठाकरेSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: