covid vaccine : करोनाची लस बनावट नाही ना? डोस देण्यापूर्वी तपासा, केंद्राचे राज्यांना निर्देश


नवी दिल्लीः केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे. नागरिकांना करोनाची लस देण्यापूर्वी ( covid vaccine ) ती बनावट आहे की नाही? हे बघावं, अशी सूचना केंद्राने केली ( Fake Covid 19 Vaccine ) आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात राज्यांना ( Vaccination In India ) पत्र लिहिलं आहे. दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत करोनावरील बनावट कोविशिल्ड लस आढळून आली आहे. यामुळे राज्यांनी सतर्क रहावं, असं केंद्र सरकारने पत्रात म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही बनावट लसीबाबत अलर्ट दिला आहे.

आता केंद्राने खरी लस ओळखण्यासाठी राज्यांना माहिती पाठवली आहे. यामुळे लस खरी आहे की बनावट हे ओळखता येईल. यात सरकारने कोविशील्ड, कोवाक्सिन आणि स्पुतनिक व्ही या तिन्ही लसींचे लेबल, रंग, ब्रँड नेमबद्दल माहिती शेअर केली आहे.

coronavirus india : चिंता वाढली! देशात पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढती, सलग ५ व्या दिवशी ४०

राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत देशात आतापर्यंत ६८.४६ लाख नागरिकांनी करोनाची लस घेतली. केंद्र सरकारने ईशान्येतील राज्यांसह एकूण ११ राज्यांना ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना करोनावरील लसीचा दुसरा डोस लवकरात लवकर देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच अनेक राज्यांमध्ये करोनावरील लसीकरण मोहीम मंदलावल्यामुळे केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.

Corbevax: मुलांसाठी आणखी एक लस, ‘कोर्बिव्हॅक्स’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: