ENG vs IND 4th Test: रोहित-पुजाराने गाजवले; कसोटीवर भारताची पकड


लंडन: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारताने ३ बाद २७० धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे सध्या १७१ धावांची आघाडी असून मैदनात कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजा खेळत आहेत. तिसऱ्या दिवशी सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजार यांनी शतकी भागिदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.

वाचा-षटकार मारून हिटमॅनने केले परदेशातील पहिले शतक; केले इतके विक्रम

तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या ४३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी धावफलक हलता ठेवला. जेम्स एडरसनने राहुलला ४६ धावांवर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागिदारी केली. दरम्यान रोहितने कसोटी करिअरमधील आठवे शतक पूर्ण केले. त्याने मोईन अलीला षटकार ठोकत १०० धावा पूर्ण केल्या. रोहितच्या शतकपाठोपाठ पुजारने अर्धशतक केले.

वाचा- Video रोहितचे क्लास शतक; पत्नी रितिकाने फ्लाइंग किस दिला

भारताची ही जोडी मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाईल असे वाटत असताना रोहित १२७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ पुजारा देखील ६१ धावांवर माघारी परतला. पुजारा बाद झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या ऐवजी पुन्हा एकदा रविंद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.

वाचा- चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने केली मोठी चूक; संघातील खेळाडूने केला खुलासा

वाचा- मनोज सरकारला रौप्यपदक; आईने शेतात काम करून दिले होते बॅडमिंटन रॅकेट

दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला तेव्हा भारताने ३ बाद २७० धावा केल्या होत्या. भारताकडे १७१ धावांची आघाडी असून कर्णधार विराट कोहली २२ तर जडेजा ९ धावांवर नाबाद होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: