मनोज सरकारला रौप्यपदक; आईने शेतात काम करून दिले होते बॅडमिंटन रॅकेट


टोकियो: पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने शनिवारी पुन्हा एकदा पदकांची लयलुट केली. पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताच्या मनोज सरकारने शानदार कामगिरी करत देशाला आणखी एक पदक जिंकून दिले. SL2 प्रकारात मनोज सरकारला कांस्यपदक मिळाले.

वाचा- Pramod Bhagat Wins Gold: पॅरालिम्पिकमध्ये चौथे सुवर्ण, प्रमोदचा बॅडमिंटनमध्ये गोल्डन स्मॅश

कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मनोजने जपानच्या दाइसुके फॉजीहाराचा २१-२०, २१-१३ असा पराभव केला. सुरेख समन्वय आणि शानदार स्मॅशच्या जोरावर मनोज सरकारने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले होते. पण तेथे त्याचा पराभव झाला. ब्रिटनच्या डेनियल बेथेलने त्याचा पराभव केला. त्यानंतर तो कांस्यपदकाच्या सामन्यासाठी कोर्टवर उतरला.

वाचा- नेबाजीत आणखी एक सुवर्णवेधासह दोन पदक; मनीष आणि सिंहराज यांना पदक

वाचा- चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने केली मोठी चूक; संघातील खेळाडूने केला खुलासा

उत्तराखंडच्या मनोज सरकारने अतिशय कठीण आणि गरीबीतून पॅरालिम्पिकपर्यंतचा प्रवास केला. दीड वर्षाचा असताना त्याला ताप आला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मनोजवर योग्य उपचार झाले नाहीत. खराब उपचारादरम्यान औषध घेतल्यानंतर त्याचा पाय कमकूवत झाला. घराची परिस्थिती इतकी खराब होती की तो सुट्टीच्या दिवशी आई-वडिलांसोबत कामावर जात असे.

लोकांना बॅडमिंटन खेळताना पाहून मनोजने घरच्यांकडून रॅकेटची मागणी केली. पण त्यासाठी पैसे नव्हते. मनोजच्या आईने सांगितले की, त्यांनी शेतात काम करून पैसे जमा केले आणि मनोजसाठी रॅकेट विकत घेतली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: