शहरातील प्रदक्षिणा मार्गासह व उपनगरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करणार – आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने प्रदक्षिणा मार्गावर 2 कोटी 25 लाख खर्चाच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

पंढरपूर – प्रदक्षिणा मार्गावरील रस्ता डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करावा अशी मागणी शहरातील नागरिक व भाविकाकडून वारंवार केली जात होती.कारण पंढरपूर धुळीचे शहर झाले आहे. याची दखल घेऊन आमदार प्रशांत परिचारक यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. त्यानुसार पंढरपूर नगरपरिषद च्या वतीने प्रदक्षिणा मार्गावर डांबरीकरण करण्यात येणार असून 2 कोटी 25 लाख खर्चाच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ गोपाळकृष्ण मंदिर, नाथ चौक व कालिका देवी मंदिर येथे आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षा श्वेता नीलराज डोंबे,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वामन बंदपट्टे, पक्षनेते अनिल अभंगराव,नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,नगरसेवक विक्रम शिरसट, राजाभाऊ सर्वगोड, संजय निंबाळकर,सुप्रिया डांगे,सुजाता बडवे, नगरसेवक डी राज सर्वगोड, विवेक परदेशी विजय विरपे, माजी नगरसेवक निलराज डोंबे, माजी नगराध्यक्ष हरिष ताठे, नगरअभियंता नेताजी पवार, माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी, अमोल डोके, नवनाथ रानगट ,संजय शहाणे, बसवेश्वर देवमारे, रा.पा. कटेकर, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे ,शैलेश आगवणे, ओंकार जोशी,ओंकार वाळूजकर,बशीर तांबोळी, इकबाल बागवान आदी उपस्थित होते.

पंढरपूर शहरातील अनेक रस्ते सध्या दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत यात कैकाडी महाराज मठ जवळ असलेल्या कुंभार गल्ली, शिंदे नाईक नगर,सर्व उपनगरे जेथे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आहेत येथे पावसाळ्यात पाणी साठलेले असते. गजानन महाराज मठामागील महत्त्वपूर्ण रस्ता जेथे वाहन पार्किंग आहे,हाँस्पिटल आहे, भक्त निवास आहे हा रस्ता काटेरी झुडपाच्या छायेत आहेत,गटारीवरील झाकणं गायब आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांत चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे की याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे .कारण या रस्त्यावरून चालत जाणे मुस्किल झाले आहे. यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी वैयक्तिक लक्ष घालून ही कामे तातडीने करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला भाग पाडावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: