​Mukhtar Abbas Naqvi: तालिबानला भारतातल्या मुस्लिमांची चिंता करण्याची गरज नाही, भारताचं प्रत्यूत्तर


हायलाइट्स:

  • ‘इथे मशिदीत दुआ मागणाऱ्या लोकांवर गोळीबार केला जात नाही’
  • तालिबानच्या मुजोरीला भारताचं प्रत्यूत्तर
  • केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तालिबानला सुनावलं

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अधिकृतरित्या सत्ता स्थापन करण्याआधीच काश्मीरबद्दल बोलताना ‘अधिकारा’ची भाषा करणाऱ्या तालिबानला भारतानं सणसणीत प्रत्यूत्तर दिलंय. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तालिबानच्या काश्मीरसंबंधी वक्तव्याला प्रत्यूत्तर देताना, ‘इथे मशिदीत दुआ मागणाऱ्या लोकांवर गोळीबार केला जात नाही, ना बॉम्बनं हल्ला केला जात. इथे ना मुलींना शाळेत जाण्यापासून रोखलं जात ना त्यांचे मुंडकं आणि पाय कापले जात’, अशा शब्दांत तालिबानला सुनावलंय.

‘मुस्लीम म्हणून तालिबानला भारतातील काश्मीमध्ये किंवा अन्य कोणत्याही देशात मुस्लिमांसाठी आवाज उंचावण्याचा अधिकार आहे. आम्ही आवाज उठवू’ असं वक्तव्य तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं मीडियाशी बोलताना केलं होतं. यावर, नक्वी यांनी ‘तालिबानला भारतातील मुस्लिमांची चिंता करण्याची गरज नाही’ असं म्हटलंय.

JK: काश्मीरमध्ये लोकांना एकत्रित येण्यास बंदी, मोबाईल इंटरनेट सेवाही बंद
PM Narendra Modi: दहशतवादाला थारा देणार नाही, पंतप्रधान मोदींचा अबुधाबीच्या राजकुमारासोबत संवाद
‘भारतात सर्वांना आपापल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. भारतात धर्माच्या नावावर अराजकता पसरवली जात नाही. इथे केवळ एक धर्म मानला जातो आणि तो म्हणजे संविधान. संविधानावरच देश चालतो आणि संविधानच सर्व स्तरांतील सर्व समाजाच्या नागरिकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देतं’, असंही यावेळी मोदी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलंय.

‘भारत आणि अफगाणिस्तानात खूप मोठं अंतर आहे. यासाठी आम्ही तालिबानला हात जोडून विनंती करतो की इथल्या मुस्लिमांची चिंता सोडून स्वत:वर लक्ष द्या’ असं म्हणत नक्वी यांनी तालिबानला त्यांच्याच शब्दात प्रत्यूत्तर दिलंय.

Bhawanipur: ममता बॅनर्जींचा जीव भांड्यात, भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर
UP Elections: उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार, सर्व्हेचा दावाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: