JK: काश्मीरमध्ये लोकांना एकत्रित येण्यास बंदी, मोबाईल इंटरनेट सेवाही बंद


हायलाइट्स:

  • गिलानी यांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात तणावाचं वातावरण
  • मोठ्या संख्येत सुरक्षारक्षक तैनात
  • गिलानींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातही राजकीय शोक

श्रीनगर : काश्मीरचे फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर खोऱ्यात तणावाचं वातावरण आहे. ९२ वर्षांचे गिलानी यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला होता. यानंतर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत लोकांना एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आलीय. तसंच मोबाईल इंटरनेट सेवाही शनिवारी सकाळी पुन्हा एकदा बंद करण्यात आली. दोन दिवस बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी रात्रीच ही सेवा बहाल करण्यात आली होती.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ फुटीरतावादी गटानं नेतृत्व करणाऱ्या आणि पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या सैय्यद अली शाह गिलानी यांना त्यांच्या निवासस्थानाजवळच एका मशिदीत सुपुर्द ए खाक करण्यात आलं. त्यांच्या निधनाननंतर खोऱ्यात सावधानता म्हणून अनेक बंदी घालण्यात आल्या आहेत.

PM Narendra Modi: दहशतवादाला थारा देणार नाही, पंतप्रधान मोदींचा अबुधाबीच्या राजकुमारासोबत संवाद
UP Elections: उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार, सर्व्हेचा दावा
श्रीनगरच्या जुन्या भागात तसंच हैदरपुरात ही बंदी अद्यापही सुरू आहे. गिलानी हे हैदरपुरा भागाचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर या भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कायदे सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मोठ्या संख्येत सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आलंय. गिलानी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातही राजकीय शोक पाळण्याची घोषणा करण्यात आली होती.
Bhawanipur: ममता बॅनर्जींचा जीव भांड्यात, भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर
Corbevax: मुलांसाठी आणखी एक लस, ‘कोर्बिव्हॅक्स’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: