ENG vs NZ: जिंकल्यानंतरही जिमी राहिला शांत; सेलिब्रेशन न करण्याचं सांगितलं कारण


अबुधाबी : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ (ICC T20 World Cup 2021) स्पर्धेच्या बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात जिमी नीशमने महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटची काही षटके शिल्लक असताना मैदानावर आलेल्या जिमीने ११ चेंडूत २७ धावा केल्या. १८ व्या षटकात तो पॅव्हेलियनमध्ये परतला आणि पुढच्याच षटकात न्यूझीलंडने विजय मिळवला. सामना जिंकताच डगआऊटमध्ये बसलेले सगळे खेळाडू आणि सहकारी आनंदोत्सव करायला लागले, पण जिमी नीशम त्याच्या जागेवरून जराही हलला नाही. पाय पसरून तो त्याच स्थितीत खुर्चीत बसून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते.

वाचा- स्वत:च्या देशाचा शत्रू झाला हा क्रिकेटपटू; म्हणाला, पाकिस्तान…

संघ अंतिम फेरीत पोहोचल्याच्या आनंदात कोणताच खेळाडू असा स्वस्थ बसून राहणार नाही, पण क्वचितच नीशमसारखी उदाहरणे पाहायला मिळतात. नीशमची नजर मैदानावर घडणाऱ्या घटनांकडे होती आणि चेहऱ्यावरूनही तो स्तब्ध असल्याचे पाहायला मिळाले. संघ जिंकल्यानंतर सेलिब्रेशन का केलं नाही, याबाबत सोशल मीडियात चर्चा सुरू झाल्यानंतर नीशमने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा- न्यूझीलंड संघाने केला अनोखा विक्रम; सलग तिसऱ्यांदा ICCच्या…

नीशम बराच वेळ बसून राहिला होता. संघातील खेळाडू आनंद साजरा करत होते, पण नीशम आपल्या जागेवर बसून होता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही आनंद साजरा करताना दिसला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर किमान हास्य तरी दिसत होते. जेव्हा नीशमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा त्याने आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. नीशमने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “काम संपले? मला नाही वाटत.”

वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलआधी पाकिस्तानला बसाल झटका; यामुळे होऊ शकतो पराभव

नीशमच्या ट्विटमधून असा अर्थ निघतो की, त्याचे लक्ष्य अंतिम सामना जिंकून विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यावर आहे. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडचा संघ जेतेपदापासून दूर राहिला. जेतेपदाने हुलकावणी दिल्याने नीशमला राहिलेली इच्छा पूर्ण करायची आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्यांनी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे. किवी संघाने २०१५ आणि २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: