रिझर्व्ह बँंकेची कारवाई ; मुंबईतील या सहकारी बँंकेला ५० लाखांचा दंड, हे आहे कारण


हायलाइट्स:

  • मुंबईतील बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप बँकेवर ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • नुकताच अॅक्सिस बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने २५ लाखांचा दंड ठोठावला होता.
  • नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर रिझर्व्ह बँकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

मुंबई : बँकिंग नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर रिझर्व्ह बँकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मागील काही महिन्यात अनेक बँकांवर यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी आरबीआयने मुंबईतील बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप बँकेवर ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहकांच्या माहितीसंदर्भात (केवायसी) नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.

सोने-चांदीमध्ये मोठी तेजी; चांदी तब्बल १८०० रुपयांनी महागली, जाणून घ्या सोन्याचा भाव
सहकारी बँकेची व्याजदर नियमावली आणि ग्राहकांच्या केवायसी संबधी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनात आल्याने रिझर्व्ह बँकेने बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप बँकेवर ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. सहकार क्षेत्रातील आणखी एका बँकेवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

वार्षिक ९.७५ टक्क्यांपर्यंत परतावा; इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचा डिबेंचर्स इश्यू
अकोला जिल्ह्यातील केंद्रीय सहकारी बँक लिमिटेड अकोला या बँकेला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या ऑडिटमध्ये केंद्रीय सहकारी बँक संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण ओळखण्यासाठी प्रभावी देखरेख करणारी प्रणाली विकसित करण्यात अपयशी ठरली. ज्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.

आर्थिक उद्धीष्ट्ये आणि जीवन विमा संरक्षण ; एक्साइड लाईफची गॅरंटीड वेल्थ प्लस योजना
नुकताच अॅक्सिस बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने २५ लाखांचा दंड ठोठावला होता. याच महिन्याच्या सुरुवातीला नागरी सहकारी बँकांनी इतर बँकांमध्ये ठेवी ठेवण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने नाशिकमधील जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला ५० लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला होता.

वार्षिक ९.७५ टक्क्यांपर्यंत परतावा; इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचा डिबेंचर्स इश्यू
पुण्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेला नागरी सहकारी बँकांशी संबंधित नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याचप्रमाणे पुण्यातील मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तर बिगर बँकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) असलेल्या तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेली येथील सेयाद शरियत फायनान्स लिमिटेड या एनबीएफसीला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: