राहुल द्रविडच्या खास माणसाची टीम इंडियात होणार एन्ट्री; क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी घेणार


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविड यांचे सहकारी म्हणून आणखी दोघांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गुरुवारी (११ नोव्हेंबर) संघाच्या सपोर्ट स्टाफची घोषणा करू शकते. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर हे त्यांच्या पदावर कायम राहणार असून गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. आतापर्यंत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. अरुण आणि श्रीधर यांच्या जागी आता नवीन नावांची भरती होणार आहे.

वाचा-स्वत:च्या देशाचा शत्रू झाला हा क्रिकेटपटू; म्हणाला, पाकिस्तान…

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टी. दिलीप हे टीम इंडियाचे पुढील क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील, तर एनसीएचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे हे गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिलीप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करत आहेत. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासोबतही ते होते. भारत-अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघासोबत काम करत असलेल्या अभय शर्मा यांचे आव्हान दिलीपसमोर होते, पण दिलीप यांच्या नावाची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुढील क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून दिलीप काही दिवसांत टीम इंडियासोबत मैदानात दिसतील.

वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलआधी पाकिस्तानला बसाल झटका; यामुळे होऊ शकतो पराभव

दोन दिवसांचा ब्रेक
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बायो बबलमधील थकव्याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर बीसीसीआय गंभीर झाल्याचे दिसत आहे. बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी खेळाडूंच्या मेळाव्यापूर्वी दोन दिवसांच्या विश्रांतीचा प्रस्ताव दिला आहे. यूएईमधील टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आणि सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना बीसीसीआयने घरी जाण्याची ऑफर दिली आहे. खेळाडू दोन किंवा तीन दिवसांचा ब्रेक घेऊ शकतात. हा निर्णय दक्षिण आफ्रिका दौरा डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे.

वाचा- न्यूझीलंड संघाने केला अनोखा विक्रम; सलग तिसऱ्यांदा ICCच्या…

टीम इंडियातील खेळाडू बऱ्याच दिवसांपासून बायो बबलमध्ये आहेत. पहिल्यांदा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, त्यानंतर खेळाडूंनी आयपीएल २०२१ मध्ये भाग घेतला आणि आता टी-२० विश्वचषक खेळले. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी बायो बबलच्या थकव्याबद्दल प्रतिक्रिया दिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: