‘एनसीडी’ मध्ये गुंतवणूक संधी; इंडेल मनीचे ५०० कोटींचे अपरिवर्तनीय रोखे


हायलाइट्स:

  • इंडेल मनी, कर्ज आणि भांडवली समभाग विक्री यांच्या संयोगातून ८०० ते १००० कोटी रुपये उभारणार आहे.
  • कंपनीच्या अपरिवर्तनीय रोख्यांनी (एनसीडी) ‘क्रिसिल बीबीबी/स्टेबल’ असे मानांकन प्राप्त
  • पहिल्या टप्प्यांतील १५० कोटी रुपयांची रोखे जारी करणार

मुंबई : दक्षिण भारतात चांगला जम बसविलेली बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) इंडेल मनी, कर्ज आणि भांडवली समभाग विक्री यांच्या संयोगातून ८०० ते १००० कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीच्या अपरिवर्तनीय रोख्यांनी (एनसीडी) ‘क्रिसिल बीबीबी/स्टेबल’ असे मानांकन प्राप्त केले असून, पहिल्या टप्प्यांतील १५० कोटी रुपयांची रोखे जारी करून कंपनी चालू वर्षात सप्टेंबरमध्ये बाजारात दाखल होणार आहेत.

सोने-चांदीमध्ये मोठी तेजी; चांदी तब्बल १८०० रुपयांनी महागली, जाणून घ्या सोन्याचा भाव
कंपनी ५०० कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीद्वारे विविध टप्प्यांमध्ये कर्ज उभारेल. मार्केट-लिंक्ड डिबेंचर, पास-थ्रू सर्टिफिकेट्स (पीटीसी) आणि डायरेक्ट असाइनमेंट्स यासारखी अन्य कर्ज साधने जारी करून कंपनी १५० ते २०० कोटी रुपये उभारेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जाद्वारे आणखी १०० ते १५० कोटी रुपये उभारले जातील.

आर्थिक उद्धीष्ट्ये आणि जीवन विमा संरक्षण ; एक्साइड लाईफची गॅरंटीड वेल्थ प्लस योजना
या व्यतिरिक्त, इंडेल मनी तिचा १५ टक्के भागभांडवली हिस्सा सौम्य करीत असून, त्यासाठी विविध खासगी गुंतवणूकदारांशी बोलणी सुरू आहे. हा सर्व निधी कंपनीच्या कर्ज व्यवसायात तसेच एकूण विस्तार कार्यक्रमासाठी वापरात येणार आहे. वाढत्या मागणीनुसार या बँकेतर वित्तीय कंपनीला आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण गंगाजळीमध्ये (एयूएम) ५५ टक्के वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सुवर्ण कर्जाचा व्यवसाय वर्षागणिक ५२ टक्के दराने वाढून ५१३ कोटी रुपये झाला आहे.

बिटकॉइनमध्ये तेजी; गाठला पुन्हा ५० हजार डॉलर्सचा टप्पा, इथेरियमची दमदार कामगिरी
इंडेल मनीचे आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये १९१ शाखांद्वारे सध्या अस्तित्व असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत एकूण शाखांची संख्या ४०० वर नेण्याचे तिचे नियोजन आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत ओडिशा आणि महाराष्ट्रात ५० नवीन शाखा आणि आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गुजरात व पश्चिम बंगालमध्ये ४५ शाखा सुरू केल्या जाणार आहेत.

वार्षिक ९.७५ टक्क्यांपर्यंत परतावा; इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचा डिबेंचर्स इश्यू
इंडेल मनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री उमेश मोहनन म्हणाले, “प्रचलित आर्थिक परिस्थिती आणि पात्रतेच्या सुलभ निकषांमुळे, सोने तारण कर्जाच्या व्यवसायाला मजबूत मागणी आणि कर्ज वितरणात वाढ दिसून येत आहे. कंपनीला ही वाढती मागणी पूर्ण करण्यास आणि नवीन भौगोलिक क्षेत्रात विस्तार करून वेगवान वाढीचा मार्ग अनुसरण्यासाठी आवश्यक निधीची मदत कर्जाच्या माध्यमातून आणि भागभांडवल वाढवून मिळेल. हा निधी आमच्यासाठी स्थिर वाढीसाठी मजबूत पाया तयार करेल.”Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: