Corbevax: मुलांसाठी आणखी एक लस, ‘कोर्बिव्हॅक्स’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी


हायलाइट्स:

  • लशीच्या मानवी चाचण्यांना परवानगी
  • औषध महानियंत्रकांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली
  • लशीची सुरक्षितता, रोग प्रतिकारशक्ती याचा अभ्यास होणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पाच वर्षांवरील मुले आणि कुमारवयीन मुलांसाठीच्या ‘कॉर्बिव्हॅक्स‘ या करोना प्रतिबंधक लशीच्या मानवी चाचण्यांना ‘बायोलॉजिकल ई‘ला परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्यात येणार आहेत, असे जैवतंत्रज्ञान विभागाने शुक्रवारी सांगितले.

‘कॉर्बिव्हॅक्स’ ही लस ‘बायोलॉजिकल ई’ने जैवतंत्रज्ञान विभाग आणि त्यांची जैवतंत्रज्ञान औद्योगिक संशोधन सहाय परिषद यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील चाचण्यांमधील निष्कर्षांचा तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास केल्यानंतर, औषध महानियंत्रकांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली आहे. आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये लशीची सुरक्षितता, रोग प्रतिकारशक्ती यांविषयी अभ्यास करण्यात येणार आहे. या परवानगीमुळे जागतिक आरोग्य संघटनेकडील मंजुरीच्या प्रक्रियेला मदत होणार आहे, असे ‘बायोलॉजिकल ई’च्या व्यवस्थापकीय संचालक महिमा दातला यांनी सांगितले.

Covid Death: करोना मृत्यूच्या नुकसान भरपाईसाठी ठोस नीतीचा अभाव, SC नं केंद्राला फटकारलं
Covid 19 : अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा चार लाखांवर पोहचली!
भारतामध्ये आतापर्यंत मुलांसाठी झायडस कॅडिलाच्या लशीलाच मंजुरी देण्यात आली आहे. ही लस १२ ते १८ वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. ‘सीरम’च्या कोव्होव्हॅक्स या लशीच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना जुलैमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. ही लस दोन ते १७ या वयोगटातील मुलांना देता येऊ शकेल.

‘कॉर्बिव्हॅक्स’ लशीच्या संशोधनातून ती छोटी मुले आणि मोठ्यांसाठी कशा पद्धतीने उपयुक्त ठरते, याकडे आमचे लक्ष आहे, अशी प्रतिक्रिया जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी दिली.

Delhi Riots: इतिहासात तपास यंत्रणांच्या अपयशासाठी दिल्ली दंगल ओळखली जाईल : न्यायालय
बलात्कार पीडित अल्पवयीन आईनं नवजात भ्रूण कमोडमध्ये फ्लश केलं
UP Elections: उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार, सर्व्हेचा दावाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: