‘खासदार नसलो तरी…’ अनंत गीते यांच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या


हायलाइट्स:

  • ‘खासदार नसलो तरी…’
  • अनंत गीते यांच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
  • गीते यांनी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत

दापोली : खासदार नसलो तरी आपण अद्याप राजकारणाला विराम दिलेला नाही. माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते यांनी स्पष्ट करत विरोधकांचा समाचार घेतला आहे. आपण सक्रियच राहणार असल्याचे गीते यांनी म्हटले आहे. कुणबी हितवर्धिनी सेवा संघ दापोलीचा मुंबईतील शिवसेना भवन दादर येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.

रायगड लोकसभा मतदासंघात झालेल्या पराभवानंतर काही दिवस शांत असलेले गीते यांनी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावेळी दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली येथे कुणबी भवन उभारणीसाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते अनंत गिते यांनी दिली आहे.

गणेशोत्सवासाठी गावी निघालात तर आधी वाचा ही बातमी, अन्यथा परत यावं लागेल घरी
आपण स्वतः कुणबी हितवर्धीनीचे सभासद झालो असून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याची त्यांनी संस्थाचालकांना सूचना व आवाहन त्यांनी यावेळी केले. कुणीही आडवे गेले तरी कुणबी भवन उभारणारच-आ.योगेश कदम आमदार योगेश कदम यांनी आपली संवाद साधताना म्हटले की, रामदासभाई कदम आणि गीते साहेबांच्या सहकार्याने कुणबी समाजाच्या स्वाभिमानासाठी दापोलीत कुणबी भवन उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून कुणी कितीही आडवे गेले तरी आपण कुणबी भवन उभारूनच दाखवू असा विश्वास उपस्थितांना दिला.

या मेळाव्यास संस्थाअध्यक्ष उन्मेश राजे, संस्था सचिव सुनिल पवार, जि. प. सदस्य अनंत करबेले, कुणबी समाजोन्नती संघाचे दापोली तालूका प्रतिनिधी आणि दापोली तालूका मुंबई शिवसेनेचे सचिव नरेश घरटकर, कुणबी समाजोन्नती संघ शाखा दापोली मुंबईचे माजी अध्यक्ष आणि दापोली तालूका कुणबी पतपेढीचे माजी अध्यक्ष रमेश काटकर, शिवसेना दापोली तालूका मुंबई संघटक चंद्रकांत शिगवण, तालूका उपसंघटक विजय ठोंबरे, माजी उपसभापती अनंत बांद्रे, उपतालूका प्रमुख गुणाजी गावणुक, शाहीर अनंतबुवा मांडवकर, शिवसेना जालगाव मुंबई विभाग प्रमुख लक्ष्मण कासेकर, बुरोंडी मुंबई विभाग संघटक प्रकाश नामोळे, दापोली तालूका कुणबी पतपेढीचे माजी संचालक जनार्दन गोवळे, खेर्डी विभाग संघटक रविंद्र बैकर, बाळाराम गोरीवले, सुकोंडी ग्रामपंचायतीचे सरपंच भरत हुमणे, लक्ष्मण हरावडे, प्रकाश रहाटवळ, केळषी विभाग संघटक रविंद्र धाडवे, सुनिल चव्हाण, दाभोळ विभाग प्रमुख किरण नाचरे, शांताराम खळे, नंदकुमार चिखले, नरेश पवार, विजय भुवड, प्रकाश आग्रे, मनिष पांढरे, सुनिल जांभळे, जयेश तुरे, संतोष पांढरे, महेंद्र शिगवण, विलास राजे, प्रकाश बटावळे, राजू गोवले, लाले, आदी उपस्थित होते.

तुमचं नाव सुशील किंवा सुशीलकुमार असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे!Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: