PAK vs AUS 2nd Semi-Final : पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात, ऑस्ट्रेलिया दिमाखात अंतिम फेरीत


दुबई : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही मातब्बर संघ आज उपांत्य फेरीच्या सामन्यात झुंजणार आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत कोण स्थान पटकावतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
सलग तीन षटकारांसह ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, गाठली अंतिम फेरी
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने सलग तीन षटकार लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची ५ बाद ९६ अशी अवस्था झाली होती. मॅथ्यू वेडने यावेळी सलग तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेडने यावेळी १७ चेंडंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नााबाद ४१ धावांची खेळी साकारली, मार्कस स्टॉइनिसने नाबाद ४० धावा करत त्याला चांगली साथ दिली. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने ४९ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

वॉर्नरपाठोपाठ मॅक्सवेलही आऊट, ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का
डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलही आऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. मॅक्सवेलने यावेळी सात धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची ५ बाद ९६ अशी अवस्था झाली आहे.
डेव्हिड वॉर्नर आऊट, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक यावेळी हुकले. वॉर्नरने ३० चेंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४९ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्हन स्मिथ आऊट
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला यावेळी फक्त पाच धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, मिचेल मार्श आऊट
ऑस्ट्रेलियाच्या संघाला उपांत्य फेरीत मिचेल मार्शच्या रुपात दुसरा धक्का बसला. मिचेलला शादाब खानने २८ धावांवर बाद केले.

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. तिसऱ्या चेंडूवर शाहिनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शून्यावर बाद केले.

पाकिस्तानने रचला विजयाचा पाया, ऑस्ट्रेलियाची दाणादाण
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली. पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानने यावेळी ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

पाकिस्तानला चौथा धक्का, शोएब मलिक आऊट
पाकिस्तानला शोएब मलिकच्या रुपात चौथा धक्का बसला. शोएबला यावेळी फक्त एका धावेवरच समाधान मानावे लागले.

पाकिस्तानला तिसरा धक्का, आसिफ अली आऊट
पाकिस्तानला आसिफ अलीच्या रुपात तिसरा धक्का बसला. आसिफला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

अर्धशतकवीर रिझवान आऊट, पाकिस्तानला दुसरा धक्का
पाकिस्तानला मोहम्मद रिझवानच्या रुपात दुसरा धक्का बसला. रिझवानने यावेळी ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६७ धावा रचल्या.

मोहम्मद रिझवानचे धडाकेबाज अर्धशतक
पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने उपांत्य फेरीच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज करत आपले अर्धशतक साजरे केले.

बाबर आझम आऊट, पाकिस्तानला मोठा धक्का
बाबर आझमच्या रुपात पाकिस्तानला मोठा धक्का बसला. बाबरने यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. पाकिस्तान १० षटकांत १ बाद ७१.

पाकिस्तानची धडाकेबाज सुरुवात
पाकिस्तानने उपांत्य फेरीच्या सामन्यात धडाकेबाज सुरुवात करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये ४७ धावांची वसूली केली.

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला…
पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: