आभासी चलनावर १८ टक्के जीएसटी? संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निर्णय येण्याची शक्यता


हायलाइट्स:

  • आगामी हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव येण्याची शक्यता
  • आभासी चलन व्यवहारांचा कणा असलेल्या ब्लॉकचेन प्रणालीवर कर आकारण्यासाठी सरकार चाचपणी करत आहे.
  • आभासी चलनाबाबत मध्यममार्ग काढता येतो का याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आभासी चलनावर (क्रिप्टोकरन्सी) बंदी घालावी की न घालावी याबाबत सरकार तसेच रिझर्व्ह बँक यांच्या स्तरावर गोंधळाचे वातावरण कायम आहे. असे असतानाच या चलनात गुंतवणूक करण्याविषयी वाढत चाललेले आकर्षण ही या दोन्ही व्यवस्थांसाठी नवी डोकेदुखी होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर, आभासी चलन आणि ‘नॉन फंजिबल टोकन’ अर्थात ‘एनएफटी’ यावर जीएसटी आकारावा काय याविषयी विचारविनिमय सुरू आहे. तसा प्रस्ताव संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर एका इंग्रजी माध्यमाकडे व्यक्त केली आहे.

दिलासा : पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आभासी चलन व्यवहारांचा कणा असलेल्या ब्लॉकचेन प्रणालीवर कर आकारण्यासाठी सरकार चाचपणी करत आहे. यामध्ये आभासी चलन व एनएफटीचाही समावेश असेल. ब्लॉकचेन प्रणालीचा व्यावसायिक तत्त्वावर वापर करताना त्यासाठी कर लावावा असे मत प्राप्तिकर विभागाने व्यक्त केले आहे आणि त्यासाठी सरकारकडून निश्चित नियमांची चौकट तयार केली जावी, असेही कर विभागाचे मत आहे. आभासी चलनासंदर्भात कायदा अस्तित्वात येण्याआधी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरावर कर आकारणी ठरवली जावी, असाही प्राप्तिकर विभागाचा आग्रह असल्याचे समजते.

गुंतवणूकदारांची दिवाळी; ‘नायका’च्या शेअरची दमदार एंट्री, पदार्पणात एक लाख कोटींना गवसणी
आभासी चलनाबाबत मध्यममार्ग काढता येतो का याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू आहे. देशात सध्या १०.०७ कोटी लोकांकडे आभासी चलन आहे. आभासी चलन बाळगणाऱ्यांची ही संख्या जगातील सर्वाधिक संख्या आहे. गेल्या वर्षभरात देशातील आभासी चलनाच्या बाजारात ६४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळेही या चलनाच्या वैधतेबाबत निर्णय घेतला जाणे गरजेचे जाले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: