हायलाइट्स:
- नागरिक त्यांचे आधार व्हेरिफिकेशन ऑफलाइन करू शकतात.
- UIDAI द्वारे तयार केलेली डिजिटल स्वाक्षरी केलेले दस्तऐवज जारी.
- सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमांवरून याबाबतची माहिती मिळेल.
सोनं झालं स्वस्त, चांदी महागली ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
आधार पडताळणीच्या पद्धती
यूआयडीएआयने (UIDAI) क्यूआर (QR) कोड पडताळणी, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी पडताळणी (Aadhaar Paperless offline e-KYC verification), ई-आधार पडताळणी, ऑफलाइन पेपर-आधारित पडताळणी (Offline paper-based verification) आणि प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी केल्या जाणाऱ्या इतर प्रकारच्या ऑफलाइन व्हेरिफिकेशनचा आधार पडताळणीच्या पद्धतींमध्ये समावेश आहे.
गुंतवणूकदारांची दिवाळी; ‘नायका’च्या शेअरची दमदार एंट्री, पदार्पणात एक लाख कोटींना गवसणी
हा नियम आधारकार्ड धारकाला डिजिटल स्वाक्षरी केलेले कागदपत्र, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी, यूआयडीएआय (UIDAI) द्वारे तयार केलेल्या आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अंक, नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख आणि छायाचित्रासारखा डेटा शेअर करण्याचा पर्याय देते. सदर व्यक्तीचा आधार क्रमांक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती (डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन) केंद्रीय डेटाबेसमधील धारकाकडून प्राप्त झालेल्या आधार क्रमांकाच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीशी जुळवली जाते.
‘पद्मभूषण’साठी मी अपात्र! जाणून घ्या उद्योगपती आनंद महिंद्रा असं का म्हणाले…
दरम्यान, व्हेरिफिकेशनच्या इतर पद्धती जसे की, वन-टाइम पिन आणि बायोमेट्रिक आधारित प्रमाणीकरण देखील ऑफलाइन पर्यायांसह सुरू राहतील. आधार डेटा तपासण्यासाठी अधिकृत एजन्सी प्रमाणीकरणाची कोणतीही पद्धत निवडू शकते. सुरक्षितता वाढविण्यासाठी अनेक घटक प्रमाणीकरणचा पर्याय देखील निवडू शकतात. नवीन नियम आधार क्रमांक धारकांना कोणत्याही वेळी त्यांचा ई-केवायसी डेटा संग्रहित करण्यासाठी व्हेरिफिकेशन एजन्सीला दिलेली संमती रद्द करण्याची परवानगी देतात.