आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार


सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. ‘उत्तम तब्येतीसाठी योग’ ही या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. सोमवारी सकळी 6.30 वाजता सोशल मिडीयावरून या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्येही योगदिनाचे आयोजन केले जाणार आहे. लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारायला आणि घरीच राहून व्यायाम आणि योग करायला चालना देणे, हे या आयोजनाचे उद्दिष्ट आहे.

विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगानं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात देशातल्या 75 ठिकाणी मर्यादित स्वरुपात योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं आहे. मुख्य कार्यक्रम दिल्लीत लाल किल्ल्यावरुन होणार आहे.





Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: