इथेनॉलची किंमत वाढवली; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असा फायदा


हायलाइट्स:

  • इथेनॉलच्या किमतीत प्रति लिटर १.४७ रुपयांनी वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
  • पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्याने भारताचे कच्च्या तेलाचे आयात बिल कमी होण्यास मदत होईल.
  • ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांनाही याचा फायदा होईल.

नवी दिल्ली : डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विपणन वर्ष २०२१-२२ मध्ये पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत प्रति लिटर १.४७ रुपयांनी वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्याने भारताचे कच्च्या तेलाचे आयात बिल कमी होण्यास मदत होईल आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांनाही याचा फायदा होईल.

शेअर व्यवहार एकाच दिवसात पूर्ण; २५ फेब्रुवारीपासून भांडवली बाजारात ही पद्धत लागू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१० नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी समितीच्या (CCEA) बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या विपणन वर्षात ऊसाच्या रसातून काढलेल्या इथेनॉलची किंमत ६२.६५ रुपये प्रति लिटरवरून ६३.४५ रुपये प्रति लीटरपर्यंत वाढविण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

नेटकऱ्यांचा कौल मान्य!अब्जाधीश एलन मस्क यांनी १.१ अब्ज डाॅलर्सचे टेस्लाचे शेअर्स विकले
इथेनॉलच्या किमतीत मोठी वाढ
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, “सी-हेवी इथेनॉलची किंमत ४५.६९ रुपयांवरून ४६.६६ रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. त्याचवेळी, बी-हेवी इथेनॉलची किंमत ५७.६१ रुपयांवरून ५९.०८ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या सरकारने ठरवून दिलेल्या किमतीवरच इथेनॉल खरेदी करतात. २०२०-२१ या विपणन वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण आठ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. २०२५ पर्यंत ते २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक संधी;’पीजीआयएम’चा ग्लोबल रिअल इस्टेट सिक्युरीटीज फंड
गडकरी म्हणाले होते की…
नितीन गडकरी म्हणाले होते की, ‘आता इथेनॉलवर धावणारी वाहने देशात यावेत, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. तसेच पुढील २ वर्षात पेट्रोल कारच्या किमतीपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रिक वाहने मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.”

इथेनॉलवर चालणार वाहने
स्वच्छ ऊर्जा इथेनॉलमुळे शेतकरी अन्नदाता नव्हे, तर ऊर्जादाताही बनू शकतो. फ्लेक्स इंजिनवर आधारित अनेक वाहने येत आहेत. भविष्यात साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल बनवले जाईल. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सरकारने इथेनॉल आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे एक प्रकारचे हिरवे इंधन (ग्रीन फ्युएल) आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होईल. पेट्रोलचे दर सध्या १०० रुपयांच्या वर गेले आहेत. तर इथेनॉलची किंमत ६५ रुपये आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: