Video: लाईव्ह सामन्यात क्रिकेट चाहता मैदानात घुसला आणि फलंदाजाला दिली धडक


लंडन: इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा चाहता जारवो(Jarvo)ने पुन्हा एकदा मैदानात प्रवेश केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जारवो नावाच्या एका व्यक्तीने भारतीय गोलंदाज होत मैदानात प्रवेश केला आणि गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. इतक नव्हे तर हा चाहता इंग्लंडच्या फलंदाजाला जाऊन धडकला देखील. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

वाचा- उमेश यादवने शानदार कमबॅक करताना केली ही कमाल

पिच इंवेडर (Pitch Invader) या नावाने प्रसिद्ध असलेल्या जारवोने याआधी देखील लाइव्ह सामन्यात मनोरंजनासाठी मैदानात आला होता. याआधी तो तिसऱ्या कसोटीत देखील तो मैदानात आला होता. त्यानंतर यॉर्कशर काउंटीने त्याच्यावर हेडिंग्ले येथे येण्यास आजीवन बंदी घेतली होती.

वाचा- संजय मांजरेकरांनी रविंद्र जडेजाची खिल्ली उडवली; म्हणाले…

चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने पाच विकेट गमावल्या होत्या. मैदानावर जॉनी बेयरस्टो आणि ओली पोप होते तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा देत जारवो मैदानात घुसला आणि गोलंदाजी करण्यासाठी तो पळू लागला. पळता पळता तो नॉन स्ट्रायकल दिशेला उभ्या असलेल्या बेयरस्टोला धडकला.

वाचा- ‘भारताला हरवत टी-२० विश्वचषकाची मोहीम सुरू करणार’; पाक कर्णधाराचा दावाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: