Video : अमृता सिंगबरोबरच्या अफेअरबाबत रवी शास्त्रींनी दिले बिनधास्त उत्तर, व्हिडीओ झाला व्हायरल…


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे नेहमीच आपल्या बिनधास्त शैलीसाठी ओळखला जातात. वाद ओढवेल हे माहीत असूनही आपल्या मनातील गोष्ट न घाबरता लोकांसमोर ठेवण्यावर शास्त्रींचा विश्वास आहे. शास्त्रींचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून असून पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना ते दिलखुलास उत्तरे देताना दिसून येत आहेत. शास्त्री यांना अमृता सिंगबाबतच्या अफेअरबाबत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांना बिनधास्तपणे उत्तर दिलं.
अमृता सिंगसोबतच्या अफेअरबद्दल शास्त्री म्हणाले…


कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हँडसम शास्त्री हे आपल्या उंची आणि स्टाइलमुळे मुलींमध्ये फेमस होते. जेव्हा शास्त्री यांनी अभिनेत्री अमृता सिंगला डेट करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी ते लपवून ठेवले नाही, उलट सर्वांसमोर उघडपणे जाहीर केले. शास्त्रींना अमृता खूप आवडत होत्या.

जेव्हा मुलाखतकाराने त्यांना विचारले की, तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त लाज कधी वाटली, तेव्हा शास्त्री म्हणाले की, ‘जेव्हा मी माझी मैत्रीण अमृताला पहिल्यांदा भेटलो. ती चित्रपटांमध्ये काम करते, हे तुम्हाला माहीत असेलच. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. मी मुलींसमोर खूप लाजायचो, पण असा दिवस येईल की, मला १० मिनिटे एक शब्दही बोलण्याची संधी मिळणार नाही, असे वाटले नव्हते. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हा फक्त तीच बोलत होती. लग्नानंतरही असेच राहील का, असे पत्रकाराने विचारले असता शास्त्रींनी लगेच उत्तर दिले की, ‘नाही तोपर्यंत मी बॉस होईन.’

स्मिता पाटील शास्त्रींच्या आवडत्या अभिनेत्री
शास्त्री पुढे म्हणाले की, त्यांनी अमृताचा कोणताही चित्रपट पाहिलेला नाही. अमृता सिंग बॉक्सिंग करत असतानाचा एक शॉट त्यांनी पाहिला होता. ते पाहून शास्त्री घाबरले होते. ‘अमृता अनिल कपूर साहेबांसोबत बॉक्सिंग करत होती. जर ती त्यांच्याशी असे करत असेल, तर माझे काय होईल? या विचाराने मी टीव्ही बंद केला होता.’

शास्त्री यांनी सांगितले की, त्यांची आवडती अभिनेत्री अमृता नसून स्मिता पाटील आहेत, पण त्या या जगात नसल्याची त्यांना खंत आहे. स्मिताच्या मृत्यूने त्यांना खूप दुःख झाले, कारण शास्त्रींचे स्मिता पाटील यांच्यावर खूप प्रेम होते. शास्त्रींना स्मिता पाटील यांचा ‘मंथन’ हा चित्रपट सर्वाधिक आवडला होता. जेव्हा शास्त्रींना चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी गमतीशीर उत्तर दिले. मला क्रिकेट खेळता येते आणि मी जर चित्रपटांमध्ये काम केले, तर जोकर वाटेल, असं उत्तर शास्त्रींनी दिले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: