सतेज पाटील यांच्या विरोधात महाडिक की आवाडे?; शुक्रवारी फैसला


हायलाइट्स:

  • विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने सतेज पाटील मैदानात.
  • सतेज पाटील यांच्या विरुद्ध अमल महाडिक किंवा राहुल आवाडे उभे राहण्याची शक्यता.
  • भाजपच्या वतीने तगडा उमेदवार देत ताकदीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या विरोधात अमल महाडिक (Amal Mahadik) की राहुल आवाडे (Rahul Awade) याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. भाजपच्या वतीने तगडा उमेदवार देत ताकदीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (whether amal mahadik or rahul awade will contest election against satej patil in the legislative council elections will be decided on friday)

विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने पालकमंत्री पाटील हे मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरविण्यासाठी गुरुवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत निवडणूक तयारीची चर्चा झाली. या निवडणुकीत भाजप सोबत राहण्याची घोषणा जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी या बैठकीत केली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज दैनंदिन रुग्णसंख्या घटली; सक्रिय रुग्णसंख्याही होतेय कमी

पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात ही निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सध्या अमल महाडिक आणि राहूल आवाडे यांची नावे चर्चेत आहेत. दोघांपैकी कुणाला मैदानात उतरायचे याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. या निवडणुकीत आवाडे व कोरे हे दोघे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना सोबत घेतानाच तगडा उमेदवार देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

क्लिक करा आणि वाचा- ‘मलिक, तुम्ही जाहीर माफी मागा, नाहीतर…’; अमृता फडणवीस यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

या निवडणुकीत ४१६ मतदार आहेत. कमी मतदार असल्याने लक्ष्मीदर्शन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात ७५ पेक्षा अधिक मतदार आहेत. यामुळे आवाडे यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. या बैठकीत माजी खासदार धनंजय महाडिक, प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, राहूल आवाडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी

विनय कोरेंची भूमिका महत्त्वाची

आमदार विनय कोरे हे राज्याच्या राजकारणात भाजप सोबत आहेत. मात्र सहकारात ते जिल्ह्यात महाविकास आघाडीसोबत आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ते या आघाडीसोबत होते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. यामुळे या निवडणुकीत चुरस वाढणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: