challenge to cm uddhav thackeray: किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना हे खुले आव्हान; म्हणाले, ‘हिम्मत असेल तर…’


सिंधुदुर्ग: आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत असून त्यांपैकी एका रिसॉर्टवर आणि स्वत: अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब हे मंत्री असल्याने त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. असे असले तरी परब यांची आज ना उद्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच, पण त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हेही कसे दाखल होतील हे भारतीय जनता पार्टी पाहील आहे, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. (unauthorized resort of minister anil parab will be demolished says kirit somaiya giving challenge to cm uddhav thackeray)

किरीट सोमय्या हे सिधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल करताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अनिल परब यांच्या अनिधिकृत रिसॉर्टवर कारवाई ही होणारच, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते वाचवून दाखवावे, असे आव्हानही सोमय्या यांनी दिले आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज रुग्णांच्या मृत्यूत वाढ झाल्याने चिंता; मात्र ‘हा’ दिलासाही

परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले असून त्यांची चौकशी देखील झालेली आहे. इतकेच नाही तर या बंगल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय देखील झालेला आहे. या दोन रिसॉर्ट्सपैकी एका रिसोर्टचे नाव साई रिसोर्ट अॅनेक्स, तर दुसऱ्या रिसॉर्टचे नाव सी-कॉन्च रिसोर्ट असे आहे. हे रिसॉर्ट आपल्या मालकीचे असल्याची बाब परब हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! मुंबईच्या मुलीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू

केंद्रीय पथकाने हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले होते. दोन्ही रिसोर्टच्या बांधकामातसीआरझेड कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. पण सरकारने केवळ एकच साई रिसोर्ट तोडण्याचे आदेश दिले आहेत. दुसरे रिसोर्ट वाचवण्याचे पाप मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेले आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, दुसरे रिसॉर्ट पाडणारच, हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी ते थांबवून दाखवावे, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- राणेंच्या टीकेनंतर आता नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

अनिल परब मंत्री आहेत म्हणून कारवाई होत नाही

लोकायुक्तासमोर या रिसॉर्टबाबत सुनावणी सुरू झाली आहे. सरकारने पण मालकांवर कारवाई होणार असे सांगितले आहे. पण कारवाई होत नाही. कारण अनिल परब मंत्री आहेत, असेही सोमय्या म्हणाले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: