यासोबतच बाबर यंदाच्या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी, जोस बटलर २६९ धावांसह अव्वलस्थानी होता. आता बाबरने त्याला मागे टाकले आहे. या छोट्या खेळीसह बाबरने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीतील २५०० धावाही पूर्ण केल्या. त्याने हा पराक्रम अवघ्या ६२ डावात केला आहे, जो आणखी एक विश्वविक्रम आहे. यासह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराटने टी-२० क्रिकेटच्या ६८ डावात २५०० धावा केल्या होत्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने चांगली सुरवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने अर्धशतकी सलामी दिली. संघाच्या ७१ धावा झाल्या असताना बाबर माघारी परतला. त्याने ३४ चेंडूत ३९ धावा केल्या. यावेळी त्याने ५ चौकार लगावले. बाबरने यावेळी कोणता विक्रम रचला आहे, जाणून घ्या….
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
३१९ – विराट कोहली (२०१४)
३१७ – तिलकरत्ने दिलशान (२००९)
३०३ – बाबर आझम (२०२१)
३०२ – माहेला जयवर्धने (२०१०)