गुंतवणूकदार होरपळले ; सेन्सेक्स गडगडला अन् एक लाख कोटींचा चुराडा


हायलाइट्स:

  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने आज गुरुवारी भांडवली बाजारात मोठी पडझड झाली.
  • मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३३ अंकांनी घसरला आणि तो ५९९१९ अंकावर स्थिरावला.
  • राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४३ अंकांची घसरण झाली.

मुंबई : जागतिक बाजारातील नकारत्मक संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने आज गुरुवारी भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३३ अंकांनी घसरला आणि तो ५९९१९ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४३ अंकांची घसरण झाली. निफ्टी १७८७३ अंकावर बंद झाला. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान एक लाख कोटींचे नुकसान झाले.

सोने दरात प्रचंड वाढ ; दोन सत्रात सोने आणि चांदी महागले, जाणून घ्या आजचा भाव
मुंबई शेअर बाजाराच्या ३० शेअरपैकी २४ शेअर घसरणीसह बंद झाले.ज्यात डॉ. रेड्डी लॅब, बजाज ऑटो, आयटीसी, एचडीएफसी बँक, नेस्ले, इन्फोसिस, मारुती, एनटीपीसी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी , एचयूएल, भारती एअरटेल, एचडीएफसी, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय या शेअरमध्ये घसरण झाली. दुसऱ्या बाजूला टायटन, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, टाटा स्टील, इंडसइंड बँक या शेअरमध्ये वाढ झाली.

नेटकऱ्यांचा कौल मान्य!अब्जाधीश एलन मस्क यांनी १.१ अब्ज डाॅलर्सचे टेस्लाचे शेअर्स विकले
निफ्टी मंचावर ५० पैकी ४२ शेअर घसरणीसह बंद झाले. मेटल इंडेक्स केवळ वधारला. दिवसभरात सेन्सेक्सने ६३७ अंकाची डुबकी घेतली होती. अमेरिकेत महागाई वाढली आहे. त्यामुळे कदाचित फेडरल रिजर्व्हकडून व्याज दरवाढ रोखली जाऊ शकते यामुळे तेथील गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. त्याचे पडसाद भारतासह आशियातील प्रमुख भांडवली बाजारावर उमटले असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे मुख्य विश्लेषक एस. रंगनाथन यांनी सांगितले.

शेअर व्यवहार एकाच दिवसात पूर्ण; २५ फेब्रुवारीपासून भांडवली बाजारात ही पद्धत लागू
आजच्या सत्रात थरमॅक्स ११ टक्के, नारायण हृदययालया ९ टक्के, क्रिसिल ८ टक्के, टिमकेन इंडिया ७ टक्के, अफ्ले इंडिया ५ टक्के, भारत डायनॅमिक्स ५ टक्के, क्वेस कॉर्प ५ टक्के , जनरल इन्शुरन्स ४ टक्के, पीडिलाईट इंडस्ट्रीज ४ टक्क्यांनी वधारले. पडत्या बाजारात या शेअरने गुंतवणूकदारांना सुखावले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: