धक्कादायक; बॉक्सिंग रिंगमध्ये जखमी झालेल्या खेळाडूचा पाच दिवसांनी मृत्यू


नवी दिल्ली: मॅक्सिकोची महिला बॉक्सर जीनत झकारियास जापाटाचा मॉन्ट्रियल स्पर्धेच्या दरम्यान मृत्यू झाला. या स्पर्धेतील एका सामन्यात तिला दुखापत झाली होती. त्यानंतर तिचा पाच दिवसांनी मृत्यू झाला. ती फक्त १८ वर्षांची होती.

वाचा-हरविंदर सिंगची कमाल; पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज

बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या यवोन मिशेलने या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री आयजीए स्टेडियममध्ये मेरी पियर होले विरुद्ध झालेल्या लढतीत दुखापत झालेल्या जापाटाचा मृत्यू झाला.

वाचा- उमेश यादवने शानदार कमबॅक करताना केली ही कमाल

या लढती दरम्यान जापाटाला अनेक वेळा कठोर ठोसे बसले. प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेला अपरकट कट पंत जापाटाच्या माउथगार्डच्या बाहेर गेला. चौथ्या फेरीत घंटा वाजल्यानंतर देखील जापाटा तिच्या कॉर्नरवर आली नाही. त्यानंतर तिला रिंगमध्येच झोपवण्यात आले. थोड्याच वेळा वैद्यकीय पथकाने तिला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेले आणि तेथून रुग्णालयात पोहोचवले.

वाचा- Video: लाईव्ह सामन्यात क्रिकेट चाहता मैदानात घुसला आणि फलंदाजाला दिली धडक

रुग्णालयात जापाटावर उपचार सुरू होते. पण अखेर तिचा मृत्यू झाला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: