विराट नाही, रोहित नाही… भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद कोणाला मिळाले पाहा…


नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात येणार आहे. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद हे अजिंक्य रहाणेला देण्यात आले आहे. रोहित शर्मा ही पूर्ण कसोटी मालिका खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर विराट कोहली आता फक्त दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथे होणार आहे. या सामन्यासाठी अजिंक्यकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना हा मुंबईमध्ये होणार आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराटकडे पुन्हा एकदा कर्णधारपद जाणार आहे. अजिंक्य रहाणे हा भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. अजिंक्यला इंग्लंडच्या दौऱ्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे अजिंक्यऐवजी रोहित शर्माकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देणार असल्याचे म्हटले जात होते. पण रोहितने या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये विश्रांती घेण्याचे ठरवले आहे. रोहित या मालिकेतील एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे रोहितच्या पर्यायाचा विचार निवड समितीला करता आला नाही. त्यामुळे रोहित आणि विराट हे दोघेही नसताना भारताच्या कर्णधारपदाची माळ अजिंक्यच्या गळ्यात घालण्यात आली आहे. पण अजिंक्य फक्त एकाच कसोटीटपुरता कर्णधार असेल, त्यानंतर मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट संघात येणार आहे आणि त्यावेळी विराट संघाचे नेतृत्व करणार आहे.

न्यझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जयपूरमध्ये एकत्र येण्याआधी खेळाडूंना बायो बबलमधून छोटा ब्रेक देण्याचा विचार केला जात आहे. वर्ल्डकपमधील खेळाडू आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील खेळाडूंना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक दिला जाऊ शकतो. हा ब्रेक २ किंवा ३ दिवसांचा असू शकतो. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत तीन सामने खेळवण्यात येणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: