उमेश यादवने शानदार कमबॅक करताना केली ही कमाल


नवी दिल्ली: चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवने क्रेग ओव्हरटनची विकेट घेत कसोटी करिअरमधील १५० बळींचा टप्पा पार केला. कसोटीत अशी कामगिरी करणारा तो भारताचा १६वा गोलंदाज ठरला आहे. तर सहावा जलद गोलंदाज आहे.

वाचा- संजय मांजरेकरांनी रविंद्र जडेजाची खिल्ली उडवली; म्हणाले..

भारताकडून याआधी कसोटीत १५० विकेट घेण्याची कामगिरी कपिल देव, श्रीनाथ, जहीर खान, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांनी केली आहे. उमेशने ९५व्या कसोटीत १५० विकेट घेतल्या. कपील देव यांनी ६७ कसोटीत १५० विकेट घेतल्या होत्या. श्रीनाथने ७२, शमीने ८०व्या, जहीरने ८९व्या तर इशांतने ९४व्या कसोटीत अशी कामगिरी केली होती.

वाचा- Video: चौथ्या कसोटीत पाहा काय झाले, रोहित शर्माला देखील विश्वास बसला नाही

उमेश यादव ९ महिन्यानंतर कसोटी क्रिकेट खेळतोय. २०१९ च्या फेब्रुवारीमध्ये उमेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती. त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. कमबॅकच्या कसोटीत उमेशने काल पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही मिनिटे आधी अफलातून चेंडूवर जो रूटला बोल्ड केले. त्यानंतर ओव्हरटन आणि डेव्हिड मलानची विकेट घेत इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला.

वाचा- अवनीनं रचला इतिहास; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं दुसरं पदक

ओव्हल टेस्टमध्ये पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला १९१ धावा करता आल्या. पहिल्या डावात रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत यांना अपयश आले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: