करोनावर नियंत्रण ठेवण्यास अपयश; जपानचे पंतप्रधान राजीनामा देणार


टोकियो: जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आपण यापुढे उमेदवारी जाहीर करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. जपानमधील करोना परिस्थिती हाताळण्याच्या मुद्यावरून त्यांच्याविरोधात जनतेत असंतोष असल्याचे वृत्त होते.

मागील वर्षी शिंजो आबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर योशिहिदे सुगा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. सुगा यांनी शुक्रवारी, सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांना आपण पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे म्हटले. येत्या २९ सप्टेंबर रोजी पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. सुगा यांच्या भूमिकेमुळे ते पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ते पंतप्रधानपदी कायम असणार आहेत.

Explainer : चीनला का हवाय अफगाणिस्तानमधील बगराम हवाईतळ?

करोना लस घेतल्यानंतर संसर्गाचा किती धोका?; संशोधनात ‘हा’ दावा!
करोना महासाथीचा संसर्ग वाढत असतानाही टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्याबद्दल सुगा यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर सुगा यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. जपानमध्ये करोना संसर्गामुळे आणीबाणी लागू केली आहे. करोनाबाधितांची संख्या १५ लाखांहून अधिक आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: