ज्याच्यामुळे पराभव झाला असता तोच ठरला सुपरहिरो; ७ चेंडूत विस्फोटक फलंदाजी


अबुधाबी: इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर होता. इंग्लंडने दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करताना त्यांनी १६ षटकात फक्त ११० धावा केल्या होत्या. विजयासाठी २४ चेंडूत ५७ धावांची गरज होती. सरासरीचा विचार केल्यास प्रत्येक षटकात १५ धावांची गरज होती आणि न्यूझीलंडने तेव्हापर्यंत ६च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलआधी पाकिस्तानला बसाल झटका; यामुळे होऊ शकतो पराभव

न्यूझीलंडने ९५ आणि १०७ धावांवर लवकर विकेट गमावली. १६ ओव्हर झाल्यानंतर जिमी निशमने १ चेंडूत फक्त १ धावा केली होती. दुसऱ्या बाजूला डेरिल मिचेलने ४० चेंडूत ४६ धावा केल्या होत्या. सर्व क्रिकेट चाहत्यांना असे वाटू लागले की न्यूझीलंड हा सामना गमावेल. मिचेल डावाच्या सुरुवातीपासून फलंदाजी करत होता, पण तो फार धीम्या गतीने खेळत होता. तरी देखील न्यूझीलंडने बाजी मारली. त्यानंतर १६व्या षटकात नीशम आला आणि त्याने जॉर्डनला पहिल्या चेंडूवर षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या दोन, त्यानंतर एक वाइड आणि पुन्हा चौकार, पुन्हा वाइड आणि पुन्हा एक षटकार, असे करून या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला २३ धावा मिळाल्या.

वाचा- न्यूझीलंड संघाने केला अनोखा विक्रम; सलग तिसऱ्यांदा ICCच्या…

१७ व्या आदिल राशिदच्या पहिल्या चेंडूवर नीशमने षटकार मारला. त्यानंतर एक धाव घेतली आणि मिचेल स्ट्राइकवर आला. त्याने षटकार मारून स्ट्राइक नीशमला दिला. पण अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला. न्यूझीलंडला १२ चेंडूत २० धावाची गरज होती. एका बाजूला पहिल्या षटकापासून फलंदाजी करणारा मिचेल आणि दुसऱ्या बाजूला मिचेल सॅटनर होता. ज्याच्या संथ फलंदाजीमुळे न्यूझीलंडचा पराभव होईल असे वाटत होते त्या डेरिल मिचेलने कमालच केली. ख्रिस वेक्सला त्याने २ षटकार आणि १ चौकारासह विजय साकारला. एका क्षणात तो सुपर हिरो झाला. त्याने ४० चेंडूत ४६ धावा केल्या होत्या. पण जेव्हा विजय मिळाला तेव्हा ४७ चेंडूत त्याच्या ७२ धावा झाल्या होत्या. त्याने ७ चेंडूत ३५०च्या स्ट्राइक रेटने २६ धावा केल्या.

वाचा- स्वत:च्या देशाचा शत्रू झाला हा क्रिकेटपटू; म्हणाला, पाकिस्तान…

या विजयासह न्यूझीलंडने २०१९च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आणि सलग ३ वेळा आयसीसीच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची अनोखा विक्रम देखील केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: