दुबई: रेस्टोरंटने लाँच केला २२ कॅरेट सोन्याचा वडा पाव!


दुबई: जीवाची मुंबई करायला येणारे पर्यटक मुंबईकरांचा आवडता पदार्थ वडा पाव खाल्ल्याशिवाय जात नाहीत. मुंबईच्या वडा पावने इतर देशांमध्येही लोकप्रियता मिळवली आहे. वडा पावचे अनेक विविध प्रकारही उपलब्ध आहेत. दुबईत मात्र, एका रेस्टोरंटने चक्क २२ कॅरेटचा वडा पाव तयार केला आहे. सध्या या वडापावची जोरदार चर्चा सुरू आहे.

ओ पाव रेस्टोरंटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या २२ कॅरेट सोन्याच्या वडा पावची माहिती दिली. जगातील पहिला २२ कॅरेटचा वडापाव लाँच केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

हा सोन्याचा वडा पाव देण्याची पद्धतही एकदम खास आहे. वडा तयार करण्याआधी बटाट्याच्या भाजीमध्ये चीज टाकले जाते. त्यानंतर पीठाच्या मिश्रणात वडा टाकला जातो आणि वडा तळला जातो. या खास वड्याला सोन्याचा वर्ख लावला जातो. ग्राहकांना हा सोन्याचा वडा पाव देताना एका लाकडी पेटीत दिला जातो. त्यामुळे वडा पाव टेबलवर आल्यानंतर एखाद्या राजेशाहीचा थाट असल्याचे भासते.

नवजात बाळाला दुर्मिळ आजार; ६० वर्षाच्या वृद्धासारखे दिसू लागले!
जीवाची दुबई करायला गेल्यानंतर हा सोन्याचा वडा पाव खाण्याची अनेकांची इच्छा होईल. मात्र, त्यासाठी अनेकांना महागडा वडा पाव खाण्यासाठी खिशा मात्र हलका करावा लागेल.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: