हायलाइट्स:
- सुरुवातीला ही पद्धत सर्वात कमी बाजार भांडवल असलेल्या १०० कंपन्यांच्या समभागांना लागू केली जाणार आहे.
- समभागांचा व्यवहार ट्रेंडिगनंतर एकाच दिवसात (टी+१) पूर्ण होणार आहे.
- सध्या हा व्यवहार ट्रेडिंग केल्यानंतर दोन दिवसांनी (टी+२) पूर्ण होत आहे.
Paytm ने रचला इतिहास; देशातील सर्वात मोठ्या ‘IPO’ला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद
सुरुवातीला ही पद्धत सर्वात कमी बाजार भांडवल असलेल्या १०० कंपन्यांच्या समभागांना लागू केली जाणार आहे. मार्च २०२२ पासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी किंवा त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवसापासून व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या ५०० कंपन्यांच्या समभागांना ही पद्धत लागू केली जाईल. या प्रकारे टप्प्याटप्प्याने टी+१ पद्धत लागू केल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांसह सर्वच गुंतवणूकदारांना व्यवहारपूर्ती कालावधी कमी झाल्याचा पुरेसा सराव होईल.
चांगली बातमी! आता तुम्ही स्वत: करु शकता आधारचे ऑफलाइन व्हेरिफिकेशन, जाणून घ्या
व्यवहारपूर्ती कालावधी व्यवहारपूर्ती कालावधी याचा अर्थ भांडवली गुंतवणूकदाराने समभाग खरेदी-विक्रीचा व्यवहार बाजारात नोंदवल्यानंतर त्याची प्रत्यक्ष पूर्तता होण्यासाठी लागणारा कालावधी होय. हा कालावधी भांडवल बाजारांना लागत असतो. टी+१ म्हणजे समभागाचा व्यवहार गुंतवणूकदाराकडून झाल्यानंतर एका दिवसात त्याची पूर्तता बाजाराकडून होणे होय.
गुंतवणूकदारांची दिवाळी; ‘नायका’च्या शेअरची दमदार एंट्री, पदार्पणात एक लाख कोटींना गवसणी
भांडवल बाजार नियंत्रक सेबीने यावर्षी ७ सप्टेंबर रोजी दोन्ही शेअर बाजारांना १ जानेवारी २०२२ पासून टी+१ पद्धत लागू करण्यास सांगितले होते. ही पद्धत वैकल्पिक तत्त्वावर इक्विटी गटात उपलब्ध असलेल्या एखाद्या समभागासाठी लागू करून पाहण्यासही सांगण्यात आले होते. मात्र असे केल्यामुळे काही व्यवहार एका दिवसात तर काही व्य़वहार सध्याच्या टी+२ पद्धतीने दोन दिवसांत पूर्ण होण्याचा गोंधळ वाढला असता.