Delhi Riots: इतिहासात तपास यंत्रणांच्या अपयशासाठी दिल्ली दंगल ओळखली जाईल : न्यायालय


हायलाइट्स:

  • दिल्ली दंगल प्रकरणात पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह, दिशाभूलचा प्रयत्न
  • सबळ पुराव्या अभावी ताहिर हुसैन याच्या भावासहीत तीन जणांची सुटका
  • ‘चौकशीच्या नावावर पोलिसांनी करदात्यांचे पैसे पाण्यात घातले’
  • ‘विभाजनानंतर सर्वात भयंकर धार्मिक दंगे

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीशी निगडीत एका दुकानाच्या लुटमारी प्रकरणात दिल्लीच्या कडकड्डूमा कोर्टानं माजी नगरसेवक ताहिर हुसैन याच्या भावासहीत तीन आरोपींना आरोपमुक्त घोषित केलंय. सबळ पुराव्यांअभावी या तिन्ही आरोपींना आरोपमुक्त करण्यात आलंय.

या सुनावणी दरम्यान कोर्टानं दिल्ली पोलिसांना अतिशय कठोर शब्दांत फटकारताना चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दिल्ली पोलिसांचा प्रभावी चौकशीचा कोणताही हेतू नव्हता, अशा शब्दांत न्यायालयानं पोलिसांवर ताशेरे ओढलेत.

चौकशी समितीनं केवळ न्यायालयाच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार म्हणजे करदात्यांकडून वसूल केल्या जाणारी कमाई वाया घालवण्यासारखं आहे. या प्रकरणात चौकशी करण्याचा पोलिसांचा कोणताही वास्तविक हेतू नव्हता, असंही न्यायालयानं म्हटलंय.

आमदार महाशय रेल्वेत अंडरवेअर-बनियानवर, आक्षेपाला शिवीगाळानं प्रत्यूत्तर
Allahabad HC: गाय…ऑक्सिजन घेणारा आणि सोडणारा एकमेव पशू : उच्च न्यायालय
‘तपास यंत्रणांच्या अपयशासाठी दिल्ली दंगल लक्षात राहील’

इतिहासात, विभाजनानंतर सर्वात भयंकर धार्मिक दंगे म्हणून दिल्ली दंगलीकडे पाहिलं जाईल. मात्र, नव्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर करत योग्य तपास करण्यात तपास यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यासाठी ही घटना नेहमी लक्षात राहील. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हे नक्कीच त्रासदायक असेल, अशी घणाघाती टीका न्यायालयानं तपास यंत्रणांवर केलीय.

अॅडिशनसल सेशल जज विनोद यादव यांनी शाह आलम (माजी नगरसेवक ताहिर हुसैन याचा भाऊ), राशिद सैफी आणि शादाब यांची या प्रकरणातातून सुटका केलीय.

दिल्ली दंगलीनंतर हरप्रीत सिंह आनंद यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दंगलीदरम्यान हरप्रीत यांचं दुकान पेटवून देण्यात आलं होतं.

एवढ्या दीर्घकाळापर्यंत तपास केल्यानंतरही पोलिसांना या प्रकरणात केवळ पाच साक्षीदार सापडलेत. ज्यातील एक पीडित आहे, दुसरा पोलीस कॉन्स्टेबल ज्ञान सिंह, एक ड्युटी अधिकारी, एक औपचारिक साक्षीदार आणि एक आयओ… न्यायालयासमोर मांडण्यात आलेले पुरावे आरोपींना शिक्षा देण्यसाठी पुरेसे नाहीत. दिल्ली दंगल प्रकरणात पोलिसांनी करदात्यांचे पैसे पाण्यात घातल्याचंही न्यायालयानं म्हटलं.

Covid 19 : अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा चार लाखांवर पोहचली!
Taliban on Kashmir: काश्मिरी मुस्लिमांसाठी आवाज उचलण्याचा आम्हाला अधिकार, तालिबानची मुजोरीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: