chandrakant patil: नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी


हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटील यांची नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका.
  • मलिक यांचे बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांशी संबंध- पाटील यांचा आरोप.
  • मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- पाटील यांची मागणी.

कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नवाब मलिक यांना आम्ही कोणत्याही गावात फिरू देणार नाही. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे. इतकेच नाही, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil has demanded to file a case of treason against Nawab Malik)

चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर पाटील यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्याबाबतीत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचे ‘आ बैल मुझे मार’, असे असते. आ बैल मुझे मार हे त्यांनी स्वत:हूनच मान्य केलेले आहे. ज्यांना दोन दिवसांनी टाडाखाली अटक झाल्यानंतर जप्त होणारी जमीन त्यांनी अंडरस्टँडिगने दोन दिवस आधी स्वस्त घेतली गेली, असे पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्या यांना कोर्टाचे समन्स, काँग्रेसने ठोकला मानहानीचा दावा

नवाब मलिक यांची एएनआयने चौकशी करावी- पाटील

आपला मुद्दा पटवून देण्यासाठी पाटील यांनी एक उदाहरणही दिले. त्यांनी सांगितले की, एसटीमध्ये मी प्रवास करतो. माझे मुन्ना महाडिकांना दोनशे रुपये द्यायचे होते. तेवढ्यात एसटीत चोर शिरतो. मला माहीत आहे की आता चोर सगळ्यांचे पैसे काढून घेणार आहे. हे ओळखून मी मुन्ना महाडीक यांचे दोनशे रुपये पटकन देऊन टाकतो. माझ्या दोनशे रुपयांची फिटम्मफाट झाली. या प्रमाणे जसे दोन दिवसांनंतर टाडा लागणार होता आणि जमीन जप्त होणार होती, ती जमीन यांनी स्वस्तामध्ये घेतली हे त्यांनी मान्य केले आहे. म्हणून एनआयएमार्फत यांची चौकशी व्हायला पाहिजे, अशा मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांना एनआयएने ताबडतोब चौकशीसाठी बोलवावे आणि हा देशद्रोह असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुंबईतील बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांशी यांचे संबंध आहेत.

क्लिक करा आणि वाचा- रियाज भाटीचे तर शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत फोटो; शेलारांचे मलिकांना प्रत्युत्तर

दरम्यान, बॉम्बस्फोटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीचे संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी या आधीच फेटाळून लावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय, … नाहीतर मीच जाऊन शिंपडतो’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: