ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलआधी पाकिस्तानला बसाल झटका; यामुळे होऊ शकतो पराभव


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपची दुसरी सेमीफायलन आज गुरुवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या महत्त्वाच्या लढतीआधी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत राहिलेल्या बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात येऊ शकते.

वाचा- स्वत:च्या देशाचा शत्रू झाला हा क्रिकेटपटू; म्हणाला, पाकिस्तान…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीआधी पाकिस्तान संघातील दोन खेळाडू फिट नसल्याचे समोर आले आहे. या मोठ्या सामन्यात जे खेळाडू विजय मिळवून देऊ शकतात तेच आता संघाबाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि ऑलराउंडर शोएब मलिक पूर्ण फिट नसल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोन्ही खेळाडूंना सर्दी आणि ताप आलाय आहे. त्यामुळे आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत ते खेळतील की नाही याबद्दल शंका आहे. जर या दोघे आज उपलब्ध होऊ शकले नाही तर पाकिस्तान संघासाठी तो मोठा झटका ठरू शकतो.

वाचा- न्यूझीलंड संघाने केला अनोखा विक्रम; सलग तिसऱ्यांदा ICCच्या…

मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक हे पाकिस्तान संघासाठी या स्पर्धेत मॅच जिंकून देणारे खेळाडू ठरले आहेत. दोघांनी दमदार कामगिरी केली आहे. हे दोन्ही संघाबाहेर गेले तर संघाचा समतोल बिघडू शकतो. त्याच बरोबर इतक्या महत्त्वाच्या सामन्यात त्यांना नव्या खेळाडूंसह मैदानात उतरावे लागले. कर्णधार बाबर सोबत रिझवानने शानदार फलंदाजी केली आहे. पण त्याला ताप आणि सर्दी असल्याने बुधवारी झालेल्या सरावात तो सहभागी झाला नव्हता. संघ व्यवस्थापनाने त्याच्या बाबतचा निर्णय सामन्याच्या आधी घेण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. हे दोन्ही खेळाडू अंतिम ११ साठी उपलब्ध झाले नाही तर पाकिस्तानची डोकेदुखी वाढू शकते. रिझवानच्या जागी सरफराज अहमद किंवा हैदर अलीला संधी मिळू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: