नवीन फंड आॅफर; मिरे अॅसेचा एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ फंड ऑफ फंड


मुंबई : मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स ( इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने अमेरिकेतील ५० मेगाकॅप कंपन्यांशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला संधी देणारा मिरे अॅसेट एस अॅण्ड पी टॉप फिफ्टी ईटीएफ हा नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणला आहे. पॅसिव्ह पध्दतीने गुंतवणूकीत सहभाग घेणारा हा भारतातील पहिला गुंतवणूक प्रकार आहे. मिरेच्या या दोन्ही फंड योजनांसाठी प्रारंभी किमान गुंतवणूक पाच हजार रुपये असुन त्यानंतर एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल.

लिबर्टीची विमा योजना; फ्लाइट रद्द झाल्यास यात्राच्या ग्राहकांना मिळणार अखंड परतावा
मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ हा फंड मुदतमुक्तश्रेणीतील योजना असून एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी टोटल रिटर्न निर्देशांकाचा आधार घेत वाटचाल करणार आहे. मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ फंड ऑफ फंड योजना सुध्दा मुदतमुक्त श्रेणीतील आहे. ती मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे.

भरपाई ; सेन्सेक्सची ५०० अंकाची झेप , गुंतवणूकदार बनले मालामाल
दोन्ही नवीन फंडाची ऑफर ( एनएफओ) एक सप्टेंबर २०२१ ला खुली झाली आहे. यातील मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ योजना १४ सप्टेंबर २०२१ ला गुंतवणूकीसाठी बंद होणार आहे तर मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ फंड ऑफ फंड गुंतवणूकीसाठी १५ सप्टेंबर २०२१ ला बंद होणार आहे. मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफचे व्यवस्थापन सिध्दार्थ श्रीवास्तव यांच्याकडे तर मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ फंड ऑफ फंड योजनेचे व्यवस्थापन श्रीमती एकता गाला यांच्याकडे राहणार आहे.

निवृत्तीवेतनाबाबत जागरुकता; अटल पेन्शन योजनेला तुफान प्रतिसाद, २८ लाख नवीन खाती
भारतीय गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रातील मेगा कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकी बाजार प्रचंड संधी देतो. अतिशय बळकट असे उत्पादन आणि सेवा तसेच नवीन आविष्कारांसाठी प्रचंड उत्साह यामुळे या कंपन्या मापदंड निर्माण करत इतरांना त्याचे अनुकरण करण्यास भाग पाडत आहेत. मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ आणि मिरे अॅसेट एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी ईटीएफ फंड ऑफ फंडच्या माध्यमातून विविध क्षेत्रांच्या वृध्दीच्या माध्यमातून या मेगा कॅप कंपन्यांत सहभागी होण्याचे उद्दीष्ट गुंतवणूकदार बाळगू शकतात, असा विश्वास मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स ( इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वरुप मोहंती यांनी व्यक्त केला.

सोने-चांदीचा भाव ; सोन्यामध्ये घसरण कायम, जाणून घ्या आजचा दर
योजनेची प्रमुख वैशिष्टे :
अमेरिकीतील विविध क्षेत्रातील आघाडीच्या ५० मेगा कॅप कंपन्यांच्या कामगिरीचे हुबेहुब प्रतिबिंब दर्शवेल अशा पध्दतीने एस अॅण्ड पी टॉप फिफ्टी इंडेक्सची रचना केलेली आहे. या कंपन्यांची निवड एस अॅण्ड पी ५०० निर्देशांकातील खुल्या बाजारमुल्याच्या आधारे केली जाईल.

– एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी इंडेक्स हा माहिती तंत्रज्ञान ते आरोग्य देखभाल, वित्तीय सेवा ते ग्राहकसेवा, ऊर्जा ते दूरसंचार आदी प्रमुख नावाजलेल्या क्षेत्रातील कंपन्यात गुंतवणूक आकर्षित करतो. या क्षेत्रांचे एकूण बाजारमुल्य तब्बल २३ ट्रिलीयन अमेरिकी डॉलर एवढे असून भारताच्या ढोबळ उत्पन्नाच्या ( जीडीपी) आठ पट आहे.

– एस अॅण्ड पी ५०० टॉप फिफ्टी निर्देशांकातील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी २० कंपन्यांचा बोस्टन कन्सलटंसी ग्रुप (बीसीजी) ने तयार केलेल्या २०२० मधील आघाडीच्या ५० नाविन्यपूर्ण कंपन्यांच्या यादीत समावेश आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: