Allahabad HC: गाय…ऑक्सिजन घेणारा आणि सोडणारा एकमेव पशू : उच्च न्यायालय


हायलाइट्स:

  • ‘गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केलं जावं’
  • ‘गोसंरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार’
  • अहमदाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी

प्रयागराज : वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गाय ही एकमात्र पशू आहे जी ऑक्सिजन घेते आणि सोडते. गायीच्या दुधाासून दही तसंच तूप तसंच मूत्र – गोबरपासून तयार करण्यात येणारे पंचगव्य अनेक असाध्य रोगांत फायदेशीर ठरतात, अशी टिप्पणी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयानं बुधवारी केलीय.

‘गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केलं जावं’

न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी याचिकाकर्ते जावेद याचा जामीन अर्ज फेटाळून लावताना ही टिप्पणी केलीय. आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून जावेदनं वादी खिलेंद्र सिंह याच्या गाई चोरून त्यांचा वध केला.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, गायीत ३३ कोटी देवी देवतांचा अधिवास आहे. ऋग्वेदात अघन्या, यजुर्वेदात गौर अनुपमेय आणि अथर्वेदात संपत्तींचं घर असा गायीचा उल्लेख करण्यात आलाय. कृष्णालाही सगळं ज्ञान गौरचरणीच प्राप्त झालं, असंही यावेळी न्यायालयानं म्हटलंय.

ईसा मसीहनं एका गायीला किंवा बैलाला मारणं हे एका मनुष्याच्या वधाप्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. बाळ गंगाधर टिळक यांनीही ‘मला मारा परंतु, गायीवर हात उचलू नका’ असं म्हटलं होतं. पंडित मदन मोहन मालवीय यांनीही संपूर्ण गोहत्येचा निषेध करण्याचं समर्थन केलं होतं. गौतम बुद्धांनी गायींना मनुष्याचा मित्र मानलं होतं. तर जैनांनी गायीला स्वर्ग म्हटलंय, अशा उदाहरणांचाही आधार न्यायालयानं आपल्या निर्णयात घेतला.

आमदार महाशय रेल्वेत अंडरवेअर-बनियानवर, आक्षेपाला शिवीगाळानं प्रत्यूत्तर
Covid 19 : अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा चार लाखांवर पोहचली!
भारतीय संविधानाच्या निर्माणाच्या वेळीही संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी गोरक्षेला मूलभूत हक्काच्या स्वरुपात सामील करण्याचा उल्लेख केला होता. हिंदू शेकडो वर्षांपासून गायीची पूजाअर्चना करत आले आहेत. ही गोष्ट गैर-हिंदूही चांगल्याच पद्धतीनं समजतात. त्यामुळेच गैर हिंदू नेत्यांनी मुघलकाळातही हिंदू भावनांचा आदर करत गोहत्येचा विरोध केला होता, असंही यावेळी न्यायालयानं म्हटलंय.

न्यायालयानं म्हटलं, आपल्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की देशातील बहुसंख्यांक मुस्लीम नेतृत्व नेहमीच गोहत्येवर देशव्यापी बंदी घालण्याच्या बाजुने राहिलंय. ख्वाजा हसन निजामी यांनी एक आंदोलन चालवलं होतं तसंच त्यांनी ‘तार्क ए गाओ कुशी’ या आपल्या पुस्तकात गोहत्येचा विरोध केला होता. सम्राट अकबर, हुमायू आणि बाबर यांनी आपल्या सत्तेच्या काळात गोहत्या न करण्याचं आवाहन केलं होतं.

गोसंरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार’

‘जमीयत ए उलेमा ए हिंद’चे मौलाना महमूद मदनी यांनी भारतात गोहत्येवर बंदी घालण्यासाठी केंद्रीय कायदे आणण्याची मागणी केलीय. हे सगळे संदर्भ लक्षात घेता गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केलं जावं आणि गोसंरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार समजला जाण्याची गरज आहे, असंही न्यायालयानं म्हटलंय.

Viral Video: भारतीय सेनेच्या जवानाला पोलिसांकडून भररस्त्यात लाथाबुक्यांनी मारहाण
तबलिघी जमात प्रकरण : बातम्यांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, SC चा दुजोरा
Jammu Kashmir: पर्यटकांनो, जम्मू काश्मीरला भेट देण्याचा प्लान असेल तर हे जरूर जाणून घ्या…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: