BJP MP Pragya Singh: ‘अजान’मुळे ‘आरती’त विघ्न, ध्यानात भंग; भाजप खासदाराची आक्षेपार्ह वक्तव्यं


हायलाइट्स:

  • ‘जगात कोणताही धर्म नाही केवळ सनातन धर्म आहे’
  • ‘पहाटे ‘अजान’मुळे केवळ लोकांची झोपमोड होते
  • ‘जेव्हा आम्ही माईक हातात घेतो तेव्हा विधर्मियांना त्रास सुरू होतो’

भोपाळ : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्यात. यावेळी, त्यांनी मशिदीतील पहाटेच्या ‘अजान‘ला आक्षेप घेतलाय. भोपाळच्या बैरसिया भागात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खासदार प्रज्ञा सिंह बोलत होत्या. यावेळी, ‘जगात कोणताही धर्म नाही केवळ सनातन धर्म आहे’ तसंच ‘आम्ही सर्वधर्म सद्भावाची भावना मानतो’ अशी वक्तव्यंही त्यांनी उपस्थितांसमोर केली.

पहाटे ‘अजान’मुळे केवळ लोकांची झोपमोड होत नाही तर रुग्णांचा रक्तदाबही वाढतो, असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलंय. सकाळी पूजा-अर्चनाही होते. ‘ब्रह्म मुहूर्ताला’ ध्यानधारणेत असणाऱ्यांचं ध्यान भंग होतं, ‘आरती’तही विघ्न येतं’ असं म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

‘सकाळी ५.०० वाजल्यापासून हे आवाज येणं सुरू होते. सगळ्यांनी झोपमोड होते. रुग्णांचा त्रास वाढतो. साधूसंन्याशीही सकाळी ४.०० ते ५.०० वाजता ध्यानसाधना करतात. परंतु, याची कुणालाही पर्वा नाही. जबरदस्तीनं लोक माईक लावतात’, असं म्हणत प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीम धर्माच्या पवित्र मानल्या जाणारा ‘अजान’ हा शब्द न उच्चारता टीका केली.

UP Police: घरावर पाकिस्तानी झेंडा फडकावल्याचा आरोप, चौघांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा
Salman Khurshid: हिंदुत्वाची इसिसशी तुलना, सलमान खुर्शीद यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

‘जेव्हा आम्ही माईक हातात घेतो तेव्हा विधर्मियांना त्रास सुरू होतो. आमच्या धर्मात अशा परंपरा नाहीत. इतर धर्मीयांच्या प्रार्थनेचे शब्द आम्ही ऐकू शकत नाहीत. आमच्या धर्मात इस्लाममध्ये हे योग्य मानलं जात नाही, असं म्हटलं जातं’ असं म्हणत त्यांनी इस्लाम धर्माचा उल्लेख आपल्या भाषणात केला. ‘आम्ही सर्वधर्म सद्भावाची भावना मानतो’, अशी पुश्तीही त्यांनी यावेळी जोडली.

‘जगात कोणताही धर्म नाही केवळ सनातन धर्म आहे’ असंही भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं म्हणणं आहे. काँग्रेसकडून मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आलाय.

वादग्रस्त वक्तव्यानंतर चर्चेत येण्याची साध्वी प्रज्ञा यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याअगोदरही पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरांबाबत बोलताना ‘हा केवळ फुकटचा प्रोपोगंडा आहे. पेट्रोल डिझेल महाग झालंय अशी काही लोकांकडून आरडा-ओरड सुरू आहे. पण ही महागाई नसून काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता आहे’ असं प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं होतं.

p chidambaram : ‘बाबरी मशीद कोणी पाडली नाही हे सांगताना लाज वाटते’, SC च्या निकालावर बोलले चिदम्बरम
arvind kejriwal : ‘क्रिकेटपटूच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणे म्हणजे हिंदुत्व नव्हे’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: