WTC FINAL : भारतासाठी हा गोलंदाज ठरला कर्दनकाळ, आयपीएलमध्ये कोहलीनेच केले होते मालामाल…


साऊदम्पटन : भारतासाठी न्यूझीलंडचा एक वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला कर्दनकाळ ठरला आहे. कारण या गोलंदाजाने भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला आहे. खास म्हणजे आयपीएलमध्ये या गोलंदाजाला विराट कोहलीच्या आरसीबीच्या संघानेच मालामाल केल्याचे सर्वांनी पाहिले होते.

न्यूझीलंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सन हा भारतासाठी कर्दनकाळ ठरला आहे. कारण या सामन्यात जेमिन्सनने भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबरच रोहित शर्मा, रिषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा या पाच फलंदाजांना बाद केले आहे. त्यामुळे जेमिन्सन हा भारतासाठी सर्वात धोकादायक ठरलेला आहे. कारण पहिल्या डावात जेमिन्सनने २२ षचकांमध्ये फक्त ३१ धावा देत भारताच्या पाच फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे. यावेळी झालेल्या आयपीएलच्या लिलावात कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने तब्बल १५ कोटी रुपये मोजत आपल्या संघात दाखल केले होते. आयपीएलमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. पण आता भारताविरुद्ध खेळताना त्याने नेत्रदीपक कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या कोहली, रोहित आणि पंतसारख्या महत्वाच्या फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला आहे.


जेमिन्सनने न्यूझीलंडसाठी आता एक नवीन विक्रमही केला आहे. न्यूझीलंडकडून खेळताना पहिल्या आठ सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा मान आता जेमिन्सनने पटकावला आहे. आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये जेमिन्सनने तब्बल ४२ विकेट्स पटकावले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या डावात जेमिन्सनचा सामना भारतीय संघ नेमका कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे आता दुसऱ्या डावात भारताचे फलंदाज किती धावा करतात, हे पाहणे महत्वाचे असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: