UP Police: घरावर पाकिस्तानी झेंडा फडकावल्याचा आरोप, चौघांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा


हायलाइट्स:

  • घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचा सोशल मीडियावरून दावा
  • हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा घटनास्थळी गोंधळ
  • हिंदुत्ववाद्यांकडून गाडीची तोडफोड

गोरखपूर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचा आरोप ठेवत चार जणांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून याबद्दल पोलिसांत तक्रार आली होती.

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार

विश्व हिंदू परिषदेचे नेते अमित वर्मा, आरएसएसचे नेते वीरेंद्र यांच्यासहीत अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले होते. ‘ब्राह्मण जनकल्याण समिती‘चे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण पांडेय यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत एका घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा झेंडा गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौराच्या मुंडेरा बाजारात वॉर्ड क्रमांक – १० चा रहिवासी असेलल्या तालिब नावाच्या व्यक्तीच्या घराच्या छताचा असल्याचाही यात दावा करण्यात आला होता.

Salman Khurshid: हिंदुत्वाची इसिसशी तुलना, सलमान खुर्शीद यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
गुजरातमध्ये ८८ कोटींचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक, समुद्रीमार्गे आणलं जात होतं ‘विष’

पोलिसांना पाकिस्तानी झेंडा आढळला नाही

पोलीस पोहचले तेव्हा घटनास्थळी त्यांना ‘पाकिस्तानचा झेंडा’ आढळला नाही. मात्र इथे पोलिसांना नागरिकांची गर्दी दिसली. संबंधित कुटुंबानं भीतीमुळे घराचा दरवाजा आतून बंद केला होता. गर्दीला बाजुला सारत पोलिसांनी संबंधित कुटुंबातील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

हिंदुत्ववाद्यांकडून गाडीची तोडफोड

या दरम्यान घराबाहेर उपस्थित असलेल्या गर्दीनं पप्पू कुरैशी यांच्या दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या गाडीची तोडफोडही केली. त्यामुळे परिस्थिती ध्यानात घेता पोलिसांनी परिसरात सुरक्षाव्यवस्था तैनात केलीय.

‘जनधन’ खात्यांमुळे गुन्हेगारीमध्ये घसरण
अफगाणिस्तान दहशतवादाचं केंद्रस्थान होऊ देणार नाही, भारतासह आठ देशांचा निर्धार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: