Covid 19 : अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा चार लाखांवर पोहचली!


हायलाइट्स:

  • भारतातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा जवळपास चार लाखांवर
  • गेल्या २४ तासांत तब्बल ३६६ मृत्यूंची नोंद
  • देशात एकूण ६७ कोटी ०९ लाख ५९ हजार ९६८ लसीच्या डोसचा वापर

नवी दिल्ली : भारताला करोना संक्रमणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोक्या दरम्यान भारतातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा जवळपास चार लाखांवर पोहचलीय.

आज (शुक्रवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (२ सप्टेंबर २०२१) ४५ हजार ३५२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल ३६६ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.

याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी २९ लाख ०३ हजार २८९ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार ८९५ वर पोहचलीय.

देशात सध्या ३ लाख ९९ हजार ७७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ३४ हजार ७९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६ वर पोहचलीय.

Viral Video: भारतीय सेनेच्या जवानाला पोलिसांकडून भररस्त्यात लाथाबुक्यांनी मारहाण
coronavirus india : ‘महाराष्ट्रासह ४ राज्यांत करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण अधिक, दुसरी लाट कायम’

  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी २९ लाख ०३ हजार २८९
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६
  • उपचार सुरू : ३ लाख ९९ हजार ७७८
  • एकूण मृत्यू : ४ लाख ३९ हजार ८९५
  • करोना लसीचे डोस दिले गेले : ६७ कोटी ०९ लाख ५९ हजार ९६८

देशातील सक्रीय रुग्णांचा दर एकूण रुग्णांच्या १.२२ टक्के आहे. दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.७२ टक्क्यांवर आहे तर देशाचा रिकव्हरी रेट ९७.४५ टक्के आहे.

भारतात पार पडलेल्या चाचण्या

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात एकूण ५२ कोटी ६५ लाख ३५ हजार ०६८ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १६ लाख ६६ हजार ३३४ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

rajnath singh : ‘राफेल लँड झालं, पण राहुल गांधींना अजूनही टेक ऑफ करता आलं नाही’
taliban india : ‘ह्यांना मेंदूच नाहीए’, केरळचे राज्यपाल खान भारतातील तालिबान समर्थक मुस्लिमांवर बरसलेSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: