अफगाणिस्तान: तालिबान आज सरकार स्थापन करणार?; अखुनझादा असणार सर्वोच्च नेते


काबूल: दोन दशकानंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेले तालिबानी आज सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. आज शुक्रवारच्या नमाजानंतर तालिबान सरकार स्थापनेबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. तालिबान आपला मोठा धार्मिक नेता अखुनझादा याला सर्वोच्च नेता म्हणून घोषित करणार आहे. मुल्ला अखुनझादा हा अनेक वर्षांपासून अज्ञातवासात असून सार्वजनिक ठिकाणी फार कमी वेळेस दिसला आहे.

अफगाणिस्तानातील सरकारस्थापनेच्या रचनेत तालिबानने इराणप्रमाणेच धार्मिक नेत्याला सर्वोच्च स्थान दिले जाणार आहे. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष हे सर्वोच्च धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याच सूचनांनुसार राज्यशकट हाकतात. अफगाणिस्तानच्या बलुचिस्तानातील कचलाक प्रांतातील मशिदीचे गेली १५ वर्षे धार्मिक नेते असलेल्या मुल्ला अखुनझादा यांनाच हे सर्वोच्च पद देण्यावर तालिबानमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे तालिबान सरकारच्या निर्णयांमध्ये त्यांचा शब्द अंतिम राहणार आहे. अफगाणिस्तानच्या नव्या अध्यक्षांना त्यांच्याच आदेशानुसार काम करावे लागणार आहे. अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांसाठी स्वतंत्र गव्हर्नर असतील. तर, प्रत्येक जिल्ह्यांसाठीही जिल्हा गव्हर्नर काम पाहतील. तालिबानने मंत्रिमंडळ स्थापनेपूर्वीच गव्हर्नर, पोलिस प्रमुख आणि पोलिस कमांडरांची नियुक्ती केली आहे.

तालिबानच्या विजयाचा आनंद अल्पजीवी ठरणार?; सप्टेंबर अखेरीस ‘हे’ मोठे आव्हान!

पंजशीर खोऱ्यात तालिबानचा भीषण हल्ला; रात्रभर रॉकेट हल्ले

सत्तास्थापनेसाठी तालिबानमधील अंतर्गत चर्चा पूर्ण झाली असून, मंत्रिमंडळ स्थापनेबाबतही अंतिम निर्णय झाला आहे, अशी माहिती तालिबानच्या माहिती व संस्कृती विभागाचे अधिकारी मुफ्ती इनामउल्लाह समनगनी यांनी गुरुवारी दिली.

तालिबान्यांना एकाकी पडण्याची भीती; भारताला केले ‘हे’ आवाहन!

तालिबानी नेत्याची मुलाखत घेणाऱ्या महिला पत्रकाराने देश सोडला, म्हणाली…
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीतही बदलणार?

अफगाण सरकारवर धार्मिक नेत्यांचे नियंत्रण राहणार असल्याने नव्या नियुक्त्या तसेच मंत्रिमंडळाचा चेहरा ठरवतानाही त्यांचेच मत अंतिम असेल. सर्व पंथांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे तालिबानने जाहीर केले असले तरी, अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: