पंजशीर खोऱ्यात तालिबानचा भीषण हल्ला; रात्रभर रॉकेट हल्ले


काबूल: पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी तालिबानने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानने पंजशीर खोऱ्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला सुरू केला असल्याचे वृत्त आहे. तालिबानच्या फौजांनी पंजशीर खोऱ्याला घेरले आहे. तालिबानकडून सातत्याने हल्ले सुरू असताना नॉर्दर्न अलायन्सकडूनही जोरदार प्रतिकार सुरू आहे.

तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्स या दोन्ही बाजूने जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. पंजशीरमधील योद्ध्यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार तालिबानकडून रॉकेट हल्ले सुरू असल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मागील तीन दिवसात पंजशीर खोऱ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये तालिबानचे मोठे नुकसान झाले आहे. तीन दिवसात तालिबानला माघार घ्यावी लागल्यानंतर त्यांनी गुरुवारी संध्याकाळी मोठा हल्ला करण्यास सुरुवात केली. या युद्धात दोन्ही बाजूकडून विरोधकांचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

taliban on kashmir : आता काश्मीरवर दोहामधील तालिबानचा प्रवक्ता बोलला; म्हणाला, ‘सशस्त्र संघर्ष…’

दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने ‘स्पुटनिक’ या रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘आम्ही पंजशीरमध्ये मुसंडी मारली असून, ११ ठाणी ताब्यात घेतली आहेत आणि ३४ बंडखोर ठार मारले आहेत. यात दोन प्रमुख कमांडरचाही समावेश आहे. आम्ही आता पंजशीरच्या प्रमुख रस्त्यापर्यंत पोहोचलो असून, शीतल जिल्हा आम्ही ताब्यात घेतला आहे. या संघर्षात आमचे फक्त दोघे जखमी झाले आहेत,’ असा दावा मुजाहिद याने केला.

तालिबान धक्का! ३५० ठार, ४० हून अधिक ताब्यात; नॉर्दर्न अलायन्सचा दावा
तर, रेझिस्टन्स फोर्सने तालिबानचा हा दावा फेटाळून लावला आहे. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमच्या योद्ध्यांचा सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा कायम आहे. तालिबानने शोतूल मार्गे जाबुल सराजमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. आमच्या योद्धांनी तालिबानींना धक्का दिला असून त्यांची मोठी जीवितहानी झाली असल्याचा दावा रेझिस्टन्स फोर्सने केला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: