पंतप्रधान मोदींकडून इराणच्या नव्या राष्ट्रपतींचे अभिनंदन, म्हणाले…


हायलाइट्स:

  • इराणचे नवनिर्वाचित राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे भारताकडून अभिनंदन
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
  • भारत-इराण यांच्यात अधिक चांगले संबंध

नवी दिल्ली/ तेहरान: इराणच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक निकालानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन केले आहे. शनिवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात कट्टरपंथी गटाचे उमेदवार रईसी यांनी एकतर्फी विजय मिळवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इब्राहिम रईसी यांना शुभेच्छा देताना म्हटले की, इराणच्या राष्ट्रपतीपदी विजयी झाल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन. भारत आणि इराण यांच्यातील संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रपणे काम करू असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

वाचा: इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी कट्टरपंथीय इब्राहिम रईसी विजयी

वाचा:उत्तर कोरियात खाद्यान्न संकट; दोन महिन्याचा अन्नधान्य साठा, महागाईचा आगडोंब

रईसी हे खामेनी यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि त्यांचा विजय निश्चित करण्यासाठीच पाच प्रमुख उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आल्याचे मानण्यात येते. त्यामुळेच, माजी अध्यक्ष मेहमूद अहमदीनेझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मतदारांना केले होते. करोनाचा प्रादुर्भाव आणि ढासळलेली अर्थव्यवस्था या दोन प्रमुख समस्यांनी इराण ग्रस्त आहे.

वाचा: अफगाणिस्तानमध्ये घडामोडी; तालिबानकडून भारताला ‘हा’ प्रस्ताव!

रईसी यांना एक कोटी ७८ लाख मते मिळाली, तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसीन रेझाई यांना ३३ लाख मते मिळाली. मध्यममार्गी अब्दलनासीर हिम्मती यांना २४ लाख मते मिळाली. चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या अमीरहुसेन हाशेमी यांना १० लाख मते मिळाली, असे प्राथमिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रेझाई आणि हिम्मती यांनी सोशल मीडियावरून रईसी यांचे अभिनंदन केले आहे. ‘देशाची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीवन सुधारेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा: करोनामुळे भारत उद्धवस्त, चीनने भरपाई द्यावी; ट्रम्प यांची मागणी

भारत-इराण संबंध

भारत आणि इराण या दोन्ही देशांमधील संबंध चांगले आहेत. मात्र, मागील काही वर्षात अमेरिकेने इराणवर निर्बंध लागू केल्यानंतर भारताने इराणकडून इंधन खरेदी कमी केली. त्यावर इराण नाराज असल्याची चर्चा आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पात भारतीय कंपन्यांचा सहभाग आहे. इराण आणि चीनमध्ये अब्जावधींचा करार झाला आहे. इराणने चीनसोबतचे संबंध चांगले करण्यावर भर दिल्याने भारतासाठी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जाते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: