रोनाल्डो बनला फुटबॉलचा बादशाह; देशाला विजय मिळवून देत केला विश्वविक्रम


अल्माँसिल, पोर्तुगाल : क्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल विश्वातील एक मोठं नाव आहे. अनेक विक्रम नावावर असलेल्या या खेळाडूला मैदानात खेळताना पाहायला जगभरातील कोट्यवधी लोक उत्सुक असतात. नुकताच त्याने इटलीचा फुटबॉल क्लब जुवेंट्स सोडला आणि इंग्लंडमधील त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये एन्ट्री घेतली. या दरम्यान त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. रोनाल्डो आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. पोर्तुगाल आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या एका सामन्यात त्याने हा कारनामा केला आहे.

वाचा-गेल्या ५० वर्षात भारतीय संघाला ही गोष्ट जमली नाही; विराट आणि कंपनीसमोर इतिहास बदलण्याचे

आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात रोनाल्डोने ८९ व्या मिनिटाला आपला ११० वा गोल करत पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. त्यानंतर त्याने इंजरी टाइममध्ये १११वा गोल करत आयर्लंडच्या चाहत्यांचा हिरमोड केला. आणि पोर्तुगालचा विजय निश्चित केला. पोर्तुगालने हा सामना २-१ ने जिंकला. रोनाल्डोने १४९ सामन्यांमध्ये १०९ गोल करणाऱ्या इराणच्या अली दाएईला मागे टाकले. अलीचा विक्रम मोडण्यासाठी रोनाल्डोला १८० सामने खेळावे लागले.

वाचा- विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर शास्त्रींनी तोडलं मौन

रोनाल्डोने फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल केले नाहीत. तर चॅम्पियन्स लीगमध्येही तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये त्याचे एकूण १३४ गोल आहेत. याशिवाय तो युरोपियन चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडूदेखील आहे. त्याने युरोपियन चॅम्पियन्स लीगमध्ये १४ गोल केले आहेत.

वाचा-चौथी कसोटी सुरू होण्याआधी विराट कोहली म्हणाला, असा संघ तयार केला ज्याचा...

रोनाल्डो स्पेनच्या जगप्रसिद्ध क्लब रिअल माद्रिदमधूनही बराच काळ फुटबॉल खेळला आहे. २००९ मध्ये तो या स्पॅनिश क्लबशी जोडला गेला आणि २०१८ पर्यंत या क्लबमध्ये राहिला. या दरम्यान त्याने रिअल माद्रिदसाठी ४५१ गोल केले. रियल माद्रिदसाठी तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये आयर्लंडने इतिहास घडवला; भारत, ऑस्ट्रेलियाला मागे टाकले

रोनाल्डो त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत तीन क्लबसाठी खेळला आहे आणि त्याने तिन्ही क्लबसाठी विजेतेपद पटकावले आहेत. २००३ ते २००८ पर्यंत तो मँचेस्टर युनायटेडमध्ये राहिला. या काळात क्लबसोबत इंग्लिश प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावण्यात तो यशस्वी झाला. त्याने रियल माद्रिदला स्पॅनिश लीगचे विजेतेपदही मिळवून दिले आणि नंतर जुवेंटसला इटालियन लीगचे विजेता बनवलं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: